आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Delhi Violence : JNU Ex Student Umar Khalid Arrested By Delhi Police Under UAPA, Act

दिल्ली हिंसाचार प्रकरण:जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदला UAPA अंतर्गत दिल्ली पोलिसांनी केली अटक, दंगल भडकावणे, कट रचणे आणि चिथावणीखोर भाषणे केल्याचा आरोप

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘पिंजरा तोड’ च्या तीन महिला सदस्यांनी घेतले होते उमर खालिदचे नाव

दिल्ली दंगलीप्रकरणी जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने रविवारी रात्री यूएपीए कायद्यांतर्गत अटक केली. पोलिसांनी उमर खालिदला चौकशीसाठी बोलावले होते. रात्री 11 ते 1 या वेळेत विशेष सेल कार्यालयातील चौकशीनंतर उमर खालिदला अटक करण्यात आली.

दिल्ली पोलिसांनी 6 मार्च 2020 रोजी उमर खालिदवर एफआयआर नोंदविला होता. या एफआयआरमध्ये उमर खालिदवर लोकांना गोळा करणे, दंगल भडकवणे, दंगलीचा कट रचणे, चिथावणीखोर भाषण देणे, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यादरम्यान लोकांना रस्त्यावर आंदोलन करण्यास उसकावणे गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.

दिल्ली पोलिसांनी हिंसाचाराबद्दल न्यायालयात सादर केलेल्या अतिरिक्त आरोपपत्रात ओमर खालिदचा उल्लेख केला होता. दिल्ली हिंसाचार प्रकरणात अटक झालेल्या ‘पिंजरा तोड’ च्या तीन महिला सदस्यांनी उमर खालिदचे नाव घेतले होते.

पोलिसांनुसार, 'पिंजरा तोड'च्या 3 विद्यार्थिनी देवांगना कलिता, नताशा नरवाल आणि गुलफिशा फातिमा यांच्यानुसार, उमर खालिदने त्यांना हिंसाचारासाठी भडकवले आणि गर्दी जमवण्याचे काम केले. या महत्त्वपूर्ण कबुलीजबाबानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उमर खालिदला समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले होते.

दिल्लीतील हिंसाचारावरील तासनतास चौकशीनंतर दिल्ली पोलिसांचा उमर खालिदवर संशय बळावला आणि त्याला त्वरित अटक केली. याची माहिती उमर खालिदचे वडील सय्यद कासिम रसून इलियास यांनी ट्विट करून दिली. दिल्ली हिंसाचारापूर्वी दिल्ली पोलिसांच्या अतिरिक्त चार्जशीटचा जोरदार उपहास करण्यात आला.