आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्दयी:सांभाळण्याचा कंटाळा आल्याने सूनेने सासूला दिले कुकराचे चटके, वृद्धेचा मृत्यू; दिल्लीतील धक्कादायक घटना

नवी दिल्ली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तपासादरम्यान वृद्ध महिलेच्या नातीने पोलिसांना सांगितले की, तिची आई आणि आजीमध्ये पूर्वीपासून वाद होत होते. पोलिसांनी वृद्धेच्या मुलाकडे विचारणा केली असता त्याने देखील याला दुजोरा दिला. त्यामुळे पोलिसांचा संशय प्रत्यक्षात उतरला अखेर सूनेला अटक करण्यात आले.

दक्षिण दिल्लीतील नेबसराय भागात एका महिलेने तिच्या सासूला कुकरने मारहाण करून तीला ठार केले. वृद्ध सासूची काळजी घेण्यावरून ती महिला त्रस्त झाली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या सूनेने सासूला त्रास देणे सुरू केले. तर अखेर गरम भांड्याचे चटके दिल्याने त्या वृद्धेचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सूनेवर खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक केली आहे. ही घटना 28 एप्रिलची रोजीची आहे.

दक्षिण दिल्लीचे डीसीपी चंदन चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 86 वर्षीय हशी सोम नेबसराय भागात एकटीच राहत होती. हशी सोम यांचा 51 वर्षांचा मुलगा सुरजीत सोम हा त्याच्या कुटुंबासोबत त्याच अपार्टमेंटच्या समोरील फ्लॅटमध्ये राहतो. त्यांच्यासोबत पत्नी व एक मुलगी आहे. हे कुटुंब मूळचे कोलकाता, पश्चिम बंगालचे आहे. 7 मे रोजी रात्री सुरजित सोम याने घरातील स्वयंपाकघरात आई खाली पडल्याची पाहिली. त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली तर ती बेशुद्धावस्थेत होती. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले, तेथे वृद्ध व्यक्ती किचनमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तर त्या वृद्धेच्या डोक्यावर तसेच चेहऱ्यावर खुणा दिसून आल्या. रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.

वर्षभरापूर्वीच आणले होते आईला सोबत
सुरजित सोम यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांची आई कोलकाता येथे एकटीच राहत होती. तिला बऱ्याच दिवसांपासून सांधेदुखीचा त्रास होता. त्यामुळे त्यांना चालण्यास त्रास होत होता. अशा परिस्थितीत सुरजीत यांनी मार्च 2022 मध्ये आईला तिच्या काळजीसाठी दिल्लीत आणले. सुरजीत यांनी घरासमोर एक फ्लॅट भाड्याने घेतला आणि त्यात आईला ठेवले. यासोबतच आईच्या फ्लॅटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते, ज्यामुळे ते त्याच्या मोबाईलवर आईची दिवसभराची अॅक्टिव्हिटी पाहत असे.

सीसीटीव्हीत झाले उघड

महिलेच्या खोलीत लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये हत्येच्या दिवसाचे कोणतेही फुटेज नसल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पण अपार्टमेंटमध्ये वीज नसल्याने सीसीटीव्ही बंद असल्याचे सुरजीत यांनी सांगितले. त्याबाबत सुरक्षा रक्षकाला विचारले. तपासादरम्यान वृद्ध महिलेच्या नातीने सांगितले की, तिची आई आणि आजीमध्ये पूर्वीपासून वाद होत होते. पोलिसांनी सुरजीत यांच्याकडे चौकशी केली असता त्याने देखील दुजोरा दिला.

मृत वृद्धेच्या शरीरावर 14 जखमेच्या खूणा
सुरजीत यांनी सांगितले की, त्याच्या पत्नीला आईला वृद्धाश्रमात पाठवायचे होते. पण तो याच्या विरोधात होता आणि त्याला आईला सोबत ठेवायचे होते. वृद्ध महिलेच्या फ्लॅटमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तपासात पोलिसांना आरोपी महिलेच्या वृद्धाच्या फ्लॅटमध्ये येण्याचे रेकॉर्डिंग मिळाले, त्यानंतर पोलिसांनी सूनेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. तेव्हा तिने या घटनेची कबूली दिली.

हे ही वाचा

हत्या:मेडिकल चेकअपसाठी आलेल्या आरोपीने केली डॉक्टरची हत्या, पायाची जखम पाहत असताना कात्रीने केले 6 वार

केरळमधील कोल्लममध्ये उपचारासाठी आणलेल्या आरोपीने डॉक्टरची हत्या केली. पायाला झालेल्या दुखापतीसाठी कोट्टरक्करा पोलिसांनी आरोपी संदीपला बुधवारी संध्याकाळी तालुक्याच्या रुग्णालयात नेले. तेव्हा त्याने रुग्णालयातील सर्जन डॉ. वंदना दास यांची टेबलावर पडलेल्या कात्रीने हत्या केली. त्याने त्यांच्यावर 6 वार केले, यात वंदना गंभीर जखमी झाल्या. - येथे वाचा संपूर्ण बातमी

हत्या:दारूच्या नशेत शेजाऱ्यानेच घातले तरुणीच्या डोक्यात मुसळ, जागीच मृत्यू; काका-मावशीलाही केली मारहाण

दारूच्या नशेत एक तरुण तिचा विनयभंग करत होता. मुलीच्या अपंग काका-काकूने विरोध केला असता त्याने त्यांनाही मारहाण केली. तरुणीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्या डोक्यात मुसळीने वार केला. त्यामुळे ती तरूणी गंभीर जखमी झाली. नातेवाईकांनी तिला रुग्णालयात नेले, परंतू वाटेतच तिचा मृत्यू झाला.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची चौकशी करत आहेत. - येथे वाचा संपूर्ण बातमी