आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delhi Women Gives 4 Storey House To Rahul Gandhi Updates । Rajkumari Gupta, Congress MP Disqualification

नेत्यासाठी थेट घराची भेट:दिल्लीतील महिलेने राहुल गांधींच्या नावे केले 4 मजली घर, रजिस्ट्रीचे पेपर्स घेऊन गेली काँग्रेस कार्यालयात

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर त्यांना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. यानंतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते 'मेरा घर राहुल गांधी का घर'च्या नावाने प्रचार करत आहेत. दरम्यान, दिल्लीतील रहिवासी असलेल्या राजकुमारी गुप्ता यांनी मंगोलपुरी येथील त्यांचे 4 मजली घर राहुल गांधींच्या नावे केले आहे.

विशेष म्हणजे लोकसभेचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना 22 एप्रिलपर्यंत 12 तुघलक लेन येथील त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करावे लागणार आहे. 27 मार्च रोजी लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने त्यांना नोटीस पाठवून 22 एप्रिलपर्यंत त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करण्यास सांगितले होते.

महिलेने रजिस्ट्रीचे पेपर्सही माध्यमांना दाखवले.
महिलेने रजिस्ट्रीचे पेपर्सही माध्यमांना दाखवले.
काँग्रेस कार्यकर्ते मेरा घर राहुल गांधी का घर कॅम्पेन राबवत आहेत.
काँग्रेस कार्यकर्ते मेरा घर राहुल गांधी का घर कॅम्पेन राबवत आहेत.

राहुल गांधींना पाठवलेल्या नोटीसमध्ये काय म्हटले होते?

राहुल गांधींना पाठवलेल्या नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, लोकसभा सचिवालयाने 24 मार्च 2023 रोजी अधिसूचना जारी करून त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व 23 मार्च 2023 पासून रद्द केले आहे. त्यामुळे, 17व्या लोकसभेचे खासदार म्हणून, ते आता त्यांना देण्यात आलेल्या 12 तुघलक लेनमधील सरकारी निवासस्थानात जास्तीत जास्त एक महिना म्हणजेच 22 एप्रिल 2023 पर्यंत राहू शकतात. त्यांना देण्यात आलेल्या या सरकारी घराचे वाटप 23 एप्रिल 2023 पासून रद्द करण्यात येत असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. यामुळे राहुल गांधींना 22 एप्रिल 2023 पर्यंत त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करावे लागेल हे स्पष्ट आहे

24 मार्च रोजी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द

24 मार्च रोजी राहुल गांधी यांचे सदस्यत्व लोकसभा सचिवालयाने अपात्र ठरवले होते. 2019च्या 'मोदी आडनाव' बदनामी प्रकरणात राहुल गांधींना गुजरातच्या न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आणि दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. तथापि, कोर्टाने थोड्याच वेळात त्यांना जामीनही मंजूर केला होता. यानंतर कायद्यानुसार लोकसभा सचिवालयाने हा निर्णय घेतला.

राजकुमारी गुप्ता असे या महिलेचे नाव आहे. त्यांनी राहुल गांधींच्या नावे आपले 4 मजली घर केले आहे.
राजकुमारी गुप्ता असे या महिलेचे नाव आहे. त्यांनी राहुल गांधींच्या नावे आपले 4 मजली घर केले आहे.

यापूर्वीही एका महिलेने राहुल गांधींच्या नावे संपत्ती केली होती...

राहुल गांधींच्या नावे महिलेने केली सर्व संपत्ती:50 लाखांची मालमत्ता, 10 तोळे सोनेही केले राहुल गांधींच्या नावे; म्हणाल्या- देशाला त्यांची गरज!

उत्तराखंडमधील एका महिलेने आपली सर्व संपत्ती काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावे केली आहे. डेहराडूनमधील एका 78 वर्षीय महिलेने आपली सर्व संपत्ती राहुल गांधींना दिली. यात 50 लाखांची स्थावर-जंगम मालमत्ता तसेच 10 तोळे सोन्याचा समावेश आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी