आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासीएए कायद्यावरुन राजधानी दिल्लीत गेल्या वर्षी जोरदार हिंसाचार उफाळून आला होता. यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू तर कित्येक लोक जण गंभीर जखमी झाले होते. दिल्ली दंगल हा पूर्वनियोजित कट होता. कारण राष्ट्रीय राजधानीत कोणत्याही घटनेनंतर अचानक हिंसा अचानक उफाळून आली नाही असे दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले आहे. या प्रकरणातील एका आरोपीला जामीन नाकारताना न्यायालयाने ही टीप्पणी केली.
कोर्टाने पुढे म्हटले की, न्यायालयात सादर केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये आंदोलकांचे आचरण स्पष्ट दिसत आहे. सरकार तसेच शहरातील लोकांचे सामान्य जीवन विस्कळीत करण्यासाठी ही दंगल सुनियोजित पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना नष्ट करणे हे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याच्या आधीच नियोजित षडयंत्राची पुष्टी करते असेही न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाने आरोपी मोहम्मद इब्राहिमचा जामीन नाकारला
न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी डिसेंबरमध्ये अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद इब्राहिमचा जामीन अर्ज फेटाळला. सुसंस्कृत समाजाच्या रचनेला धोक्यात आणण्यासाठी वैयक्तिक स्वातंत्र्याचा वापर केला जाऊ शकत नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. सीसीटीव्ही क्लिपमध्ये इब्राहिम तलवारीने जमावाला धमकी देताना दिसत आहे.
चांद बागमध्ये पोलिसांवर हल्ल्याशी संबंधित प्रकरण
हे प्रकरण ईशान्य दिल्लीतील चांद बागमधील दंगलीदरम्यान पोलिसांवर जमावाने केलेल्या हल्ल्याशी संबंधित आहे. हिंसाचारादरम्यान, हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला असून दुसरा अधिकारी गंभीर जखमी झाला होता.
न्यायालयाने या महिन्यात पोलिसांना फटकारले होते
या महिन्यात दिल्ली कोर्टाने दिल्ली दंगलीसाठी पोलिसांना फटकारले होते. फाळणीनंतरच्या सर्वात भीषण दंगलीचा तपास दिल्ली पोलिसांनी केला होता, तो दु: खद असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. ही तपासणी असंवेदनशील आणि निष्क्रिय असल्याचे सिद्ध झाले आहे असेही न्यायालयाने सुनावणीदम्यान म्हटले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.