आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग 5 व्या दिवशी दिल्लीची हवा खूप खराब:एअरक्वालिटीमध्ये 17 पॉइंटची सुधारणा, पण अजुनही हे खूप गंभीर कॅटेगिरी कायम

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील हवेची गुणवत्ता सलग पाचव्या दिवशी अत्यंत खराब कॅटेगिरीत आहे. सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR) नुसार, दिल्लीचा वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) आज 362 वर आहे. बुधवारी, AQI 372 होता, म्हणजेच 17 अंकांची सुधारणा झाली आहे, परंतु परिस्थिती अजूनही गंभीर आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, रविवारी जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून त्यानंतर हवेची गुणवत्ता सुधारण्याची अपेक्षा आहे.

दिल्ली सरकारचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी बुधवारी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजनांची घोषणा केली. ते म्हणाले की, 21 नोव्हेंबरपर्यंत सरकारी विभागांमध्ये 100% वर्क फ्रॉम होम लागू करण्यात आली आहे. 21 नोव्हेंबरपर्यंत कंस्ट्रक्शन आणि डिमोलिशनचे कामही थांबवण्यात आले आहे, तर पुढील आदेशापर्यंत शाळा आणि इतर शैक्षणिक संस्था बंद राहतील. यासोबतच दिल्ली सरकार 1000 सीएनजीवर चालणाऱ्या बसेस भाड्याने घेणार आहे जेणेकरुन वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.

सुप्रीम कोर्टाने काल केली होती सुनावणी
केंद्र आणि राज्य सरकारमध्ये पराली जाळण्याविषयी आरोप-प्रत्यारोपांवर मुख्य न्यायाधीश एनव्ही रमना म्हणाले की, सरकार जर पराली जाळण्याविषयी शेतकऱ्यांना बोलू इच्छित असेल तर बोलावे, मात्र आम्हाला शेतकऱ्यांवर कोणताही दंड लावायचा नाही.

दिल्लीत 5-7 तारांकित हॉटेल्समध्ये बसून शेतकऱ्यांवर भाष्य करणं खूप सोपं आहे, पण शेतकऱ्यांना पराली का जाळावी लागते हो कोणालाच समजून घ्यायचं नाही. ते म्हणाले की, इतर कोणत्याही स्रोतापेक्षा जास्त प्रदूषण टीव्ही चॅनेलवरील वादविवादातून पसरते. तिथल्या प्रत्येकाचा काही ना काही अजेंडा असतो. आम्ही येथे तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत.

बातम्या आणखी आहेत...