आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दिल्लीचा सलग तिसरा पराभव; राजस्थान विजयी

गुवाहाटी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर यशस्वी (६०), गाेलंदाज ट्रेंट बाेल्ट (३/२९) आणि युजवेंद्र चहलने (३/२७) राजस्थान राॅयल्सचा आयपीएलमध्ये आपल्या घरच्या मैदानावर विजय साजरा केला. यासह राजस्थान संघाने यंदाच्या सत्रात दुसऱ्या विजयाची नाेंद केली. कर्णधार संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान संघाने लीगमधील आपल्या तिसऱ्या सामन्यात डेव्हिड वाॅर्नरच्या दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. राजस्थान संघाने ५७ धावांनी सामना जिंकला. यासह राजस्थान संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानावर धडक मारली. दुसरीकडे सुमार खेळीमुळे दिल्ली संघाला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.

प्रथम फलंदाजी करताना राजस्थान राॅयल्स संघाने ४ गड्यांच्या माेबदल्यात दिल्लीसमाेर विजयासाठी २०० धावांचे टार्गेट ठेवले. प्रत्युत्तरात दिल्ली संघाला निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावत १४२ धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्ली संघाने सलग तिसरा सामना गमावला आहे. दिल्ली संघाला आयपीएलच्या इतिहासात गत सहा वर्षांत एकदाही २००+ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. यामुळे संघाला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे. हीच पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी आता कर्णधार वाॅर्नरने एकाकी झंुज देत ६५ धावांची खेळी केली. मात्र, त्याला आपल्या टीमचा पराभव टाळता आला नाही. २०१७ मध्ये दिल्ली संघाने सरस खेळीतून २०९ धावांचे लक्ष्य गाठून गुजरातचा पराभव केला हाेता. आता यजमान राजस्थान संघाने आपल्या दुसऱ्या हाेमग्राउंड बरसपारावर दमदार सुरुवात केली.