आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Delta Plus Variant Cases Update; Coronavirus India News | Delta Cases Found In Jammu Maharashtra Madhya Pradesh Kerala Punjab

डेल्टा प्लसने तिसऱ्या लाटेचा धोका:कोरोनाच्या या स्ट्रेनचे देशात 40 रुग्ण, यामध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि केरळचे लोक; याला व्हेरिएंट ऑफ कंसर्नच्या कॅटेगिरीमध्ये ठेवण्यात आले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार डेल्टा प्लस व्हेरियंटला कसे सामोरे जावे यासंबंधी माहिती देण्यासाठी राज्यांना पत्र लिहिले गेले आहे.

देशातील कोरोनाच्या कमी होत असलेल्या प्रकरणांदरम्यान भीतीदायक वृत्त समोर येत आहेत. देशातील दुसर्‍या लाटेला जबाबदार असणारा कोरोना व्हेरिएंट डेल्टा पुन्हा एकदा फॉर्म बदलून आक्रमण करत आहे. याला डेल्टा प्लस असे नाव देण्यात आले आहे. तज्ज्ञांनुसार डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट निर्माण होऊ शकते.

केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार देशात आतापर्यंत या स्ट्रेनची 40 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या प्रकारची सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळली आहेत. याशिवाय मध्य प्रदेश आणि केरळमध्येही या स्ट्रेनची पुष्टी झाली आहे. या राज्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

डेल्टा प्लसविषयी 4 महत्त्वाचे पॉइंट्स

 • डेल्टा व्हेरिएंटचे सर्वस्ट्रेनला व्हेरिएंट ऑफ कंसर्न मानले जाईल. डेल्टा प्लविषयी सर्वात पहिले पब्लिक हेल्थ इंग्लंडमध्ये 11 जूनला एक रिपोर्ट देण्यात आला होता.
 • भारतात 45 हजारांपेक्षा जास्त सँपलची सीक्वेंसिंग झाली, ज्यामध्ये डेल्टा प्लसविषयी 40 प्रकरणे समोर आली. दरम्यान यामध्ये खूप जास्त वाढ दिसत नाही.
 • डेल्टा प्लसचे भारतात पहिले प्रकरण 5 एप्रिलला महाराष्ट्रात घेतलेल्या एका नमुन्यात आढळले होते.
 • जगभरात डेल्टा प्लसचे 205 प्रकरणे आढळले आहेत, ज्यामधून अर्ध्यापेक्षा जास्त प्रकरणे अमेरिका आणि ब्रिटेनमध्ये आहेत.

केंद्र सरकारची एडवायजरी
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार डेल्टा प्लस व्हेरियंटला कसे सामोरे जावे यासंबंधी माहिती देण्यासाठी राज्यांना पत्र लिहिले गेले आहे. भारतीय SARS-CoV-2जीनोमिक कन्सोर्टियाच्या नुकत्याच झालेल्या निष्कर्षांच्या आधारे महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश यांना मार्गदर्शक तत्त्वांनुसार या प्रकाराला सामोरे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये याची प्रकरणे समोर आली आहेत, त्या ठिकाणी कंटेनमेंटचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.

इतर राज्यातही रुग्ण आढळण्याची शक्यता
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, हा स्ट्रेन या 3 राज्यांव्यतिरिक्त अनेक राज्यांमध्ये आढळला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात या व्हेरिएंटची सर्वाधिक 21 प्रकरणे नोंदवण्यात आली असून मध्य प्रदेशात 6 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त केरळ, तामिळनाडू, कर्नाटकमधील 2 आणि पंजाब, आंध्र प्रदेश आणि जम्मूमध्ये प्रत्येकी एक प्रकरणात हे व्हेरिएंट आढळले आहे.

वेरिएंट ऑफ इंटरेस्ट प्रकारात डेल्टा प्लस
निती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणाले की, डेल्टा प्रकार जगातील 80 देशांमध्ये आहे. हा प्रकार भारतातील दुसरी लाट वाढवण्यास कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. याला व्हेरिएंट ऑफ कंसर्नच्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. डेल्टा प्लस प्रकार सध्या ब्रिटन, अमेरिका, जपान, रशिया, भारत, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, नेपाळ आणि चीन या 9 देशांमध्ये आढळला आहे. हे सध्या व्हेरिएंट ऑफ कंसर्नच्या श्रेणीत आहे.

डेल्टा प्लस व्हेरिएंट पसरावा असे वाटत नाही

 • तिसरी लाट येण्याच्या प्रश्नावर डॉ. पॉल म्हणाले- व्हायरस कधी आपले रुप बदलेल याविषयी कोणीच सांगू शकत नाही. याचा आधीच अंदाज लावला जाऊ शकत नाही. परंतु जगात असे बरेच देश आहेत येधे दुसरी लहर किंवा चौथी लहर आली नाही . म्हणजेच, जर आपण सावधगिरी बाळगली तर कदाचित ही लाट नियंत्रणात राहू शकेल. दरम्यान दिलासा देणारी बाब आहे की 7 मेच्या तुलनेत देशात कोरोना प्रकरणात 90% घट झाली आहे.
 • अमेरिकन कंपनी मॉडर्ना यांनी भारतात कोरोना लस पुरवल्याच्या प्रश्नावर पॉल म्हणाले की कंपनीच्या मागण्यांबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. यावर चर्चा सुरूच आहे. मोडेर्नाने भारतात लस पुरवण्याच्या संदर्भात काही अटी लादल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...