आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Delta Plus Variant Of Coronavirus And COVID Vaccine; Who Is At Higher Risk? Ways To Prevent Infection​​​​​​​; News And Live Updates

कोरोनाची तिसरी लाट:लसीकरणानंतरही डेल्टा व्हेरिएंटचा 50 वर्षांवरील लोकांना जास्तीत जास्त धोका, जाणून घ्या या व्हायरसपासून कसा बचाव करावा?

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • हा व्हेरिएंट लवकरात लवकर फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने जगभरातील लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. यामुळे कित्येक देशांतील अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या आहे. परंतु, संपू्र्ण जग या महामारीशी सामना करत मोठ्या हिंमतीने लढत आहे. दिलासादायक बातमी म्हणजे जगभरातील कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. परंतु, त्यासोबतच डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे संपूर्ण जग चिंतेत असून याला रोखण्यासाठी उपायोजना करत आहे.

डेल्टा प्लस व्हेरिएंट आधी असलेल्या व्हेरिएंटपेक्षा अधिक धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे लसीकरण झालेले 50 वर्षांवरील लोकांना जास्त धोका असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या व्हेरिएंटपासून वाचायचे कसे प्रश्न सर्वांना पडत आहे. त्यामुळे चला तर जाणून घेऊया... या व्हेरिएंटपासून बचाव कसा करावा?

या व्हेरिएंटमुळे संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त
डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंट सर्वांसाठी चिंतेचा विषय असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट म्यूटेशननंतर अधिक धोकादायक असून याचे संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हा व्हेरिएंट लवकरात लवकर फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो
काही तज्ञांच्या मते, कोरोनाचा हा नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंट बाधितांना लवकरात कमजोर करत असून रुग्णांच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो. व्हेरिएंटच्या या म्यूटेशनला K417N नाव देण्यात आले आहे. हा व्हेरिएंटनंतर बीटा आणि गॅमा व्हेरिएंटमध्ये मिसळतो. हा विषाणू इतर विषाणूपेक्षा मानवाच्या फुफ्फुसांपर्यंत लवकरात लवकर पोहोचत असल्याचे नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्यूनिझेशनचे (NTAGI) चे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा यांनी सांगितले आहे.

डेल्टा प्लसमुळे 50 वर्षांवरील लोकांचे अधिक मृत्यू
एका अहवालानुसार, डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे 50 वर्षांवरील लोकांचे अधिक मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे 117 लोकांचे मृत्यू झाले असून यातील जास्तीत जास्त लोक 50 वर्षांवरील होते. दरम्यान, 50 वर्षांवरील 38 लोक असे होते ज्यांनी कोरोनाचे कोणतचे डोस घेतलेले नाही. तर 50 लोक असे होते ज्यांनी दोन्ही डोस घेतलेले होते.

डेल्टा व्हेरिएंटपासून कसे वाचावे?

 • लसीकरण करणे
 • दोन मास्क वापरणे
 • सामाजिक अंतर ठेवणे
 • वारंवार हात धुणे

डब्ल्यूएचओने डेल्टा प्रकाराबद्दल दिली चेतावणी
जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या प्रकाराबद्दल चेतावणी दिली आहे. हा व्हेरिएंट इतर व्हेरिएंटपेक्षा जास्तच धोकादायक आणि संसर्गजन्य असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सगळ्याच देशांनी याला रोखण्यासाठी तयारी करण्यास सांगितले होते. कारण आधीच कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमुळे अनेक देशाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

सरकारच्या गाइडलाईनमधील महत्त्वाचे मुद्दे

 • ज्या राज्यांत किंवा जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहे, तेथे गर्दी टाळण्यासाठी व लोकांच्या हालचालीला नियंत्रित करण्यासाठी त्वरित उपाययोजना केल्या जाव्यात.
 • ज्या जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस प्रकरणे आढळली आहेत, त्या ठिकाणी त्वरित कंटेंटमेंट झोन तयार केले जावेत. त्यासोबतच निर्बंधांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.
 • कोरोनाबाधीतांचे नमुने तातडीने भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक कन्सोर्टिया (INSACOG) च्या प्रयोगशाळांमध्ये पाठवावेत.

डेल्टा प्लसचे तीन वैशिष्ट्ये

1. ते फार वेगाने पसरते.

2. यामुळे फुफ्फुसांना लवकर नुकसान पोहचते.

3. मोनोक्लोनल अॅन्टीबॉडी थेरपीचा प्रभाव कमी करते.

डेल्टा प्लस व्हेरिएंट नेमके काय?
कोरोनाच्या व्हायरसमध्ये झालेल्या बदलास विविध नावे देण्यात आली आहेत. देऊन भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसच्या डबल म्यूटंट स्ट्रेन B.1.617.2 ला जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा व्हेरिएंट असे नाव दिले. B.1.617.2 मध्ये आणखी एक म्यूटेशन K417N झाले आहे. हा व्हेरिएंट यापूर्वीच्या बीटा आणि गामा व्हेरिएंटमधूनच आहे. यातूनच तयार झालेल्या नवीन व्हेरिएंटला डेल्टा प्लस किंवा AY.1 आणि B.1.617.2.1 असे म्हटले जात आहे. K417N म्यूटेशन झालेले नवीन व्हेरिएंट आधीच्या व्हायरसच्या तुलनेत वेगाने पसरते. यावर व्हॅक्सीन आणि औषधींचा प्रभाव सुद्धा कमी पडतो.

डेल्टा प्लसविषयी 4 महत्त्वाचे पॉइंट्स

 • डेल्टा व्हेरिएंटचे सर्वस्ट्रेनला व्हेरिएंट ऑफ कंसर्न मानले जाईल. डेल्टा प्लविषयी सर्वात पहिले पब्लिक हेल्थ इंग्लंडमध्ये 11 जूनला एक रिपोर्ट देण्यात आला होता.
 • भारतात 45 हजारांपेक्षा जास्त सँपलची सीक्वेंसिंग झाली, ज्यामध्ये डेल्टा प्लसविषयी 40 प्रकरणे समोर आली. दरम्यान यामध्ये खूप जास्त वाढ दिसत नाही.
 • डेल्टा प्लसचे भारतात पहिले प्रकरण 5 एप्रिलला महाराष्ट्रात घेतलेल्या एका नमुन्यात आढळले होते.
 • जगभरात डेल्टा प्लसचे 205 प्रकरणे आढळले आहेत, ज्यामधून अर्ध्यापेक्षा जास्त प्रकरणे अमेरिका आणि ब्रिटेनमध्ये आहेत.
बातम्या आणखी आहेत...