आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delta Variant Changed To More Dangerous Delta+ Not Affected By Cocktail Of Monoclonal Antibodies

चिंताजनक:कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे स्वरुप बदलले, आधीपेक्षा जास्त धोकादायक बनलेल्या डेल्टा+ ने वाढवली चिंता

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या नवीन व्हेरिएंटवर मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॉकटेलचा परिणाम होणार नसल्याचा संशय

एकीकडे देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट होताना दिसत आहे, तर दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस जबाबदार असलेला डेल्टा व्हेरिएंट आता अजून जास्त धोकादायक झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डेल्टा व्हेरिएंट आता डेल्टा+ मध्ये बदलला आहे. शास्त्रज्ञांना संशय आहे की, रुग्णांना सध्या दिली जाणारी मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॉकटेल या नवीन व्हेरिएंट परिणाम करणार नाही. इंग्रजी न्यूज वेबसाइट टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत रिपोर्ट दिली आहे.

टाइम्सच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, ब्रिटनची आरोग्य संस्था पब्लिक हेल्थ इंग्लंड (PHE) ने सांगितल्यानुसार, डेल्टा व्हेरिएंटचे 63 जीनोम नवीन K417N म्यूटेशनसह समोर आले आहेत. PHE नुसार, डेल्टा व्हेरिएंटमध्ये रुटीन तपासादरम्यान डेल्टा+ ची माहिती मिळाली. कोविड व्हेरिएंट्सवर PHE च्या लेटेस्ट रिपोर्टनुसार भारतात 7 जूनपर्यंत डेल्टा+ व्हेरिएंटचे 6 रुग्ण आढळले आहेत.

दिल्लीच्या इंस्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स अँड इंटेग्रेटिव बायोलॉजीचे डॉ. विनोद स्केरिया सांगतात की, K417N म्यूटेशनबाबात मोठी चिंता अशी आहे की, याच्यावर अँटीबॉडीज कॉकटेलचा काहीच परिणाम होताना दिसत नाही.

मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॉकटेल काय आहे ?
मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॉकटेल कॅसिरिविमॅब (Casirivimab) आणि इम्डेविमॅब (Imdevimab) ने तयार झाले आहे. याला फार्मा कंपनी सिप्ला आणि रोश (Roche) इंडियाने मिळून तयार केले आहहे. भारतात याला कोरोना उपचारात आपातकालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे.

बातम्या आणखी आहेत...