आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Delta Variant Of Coronavirus And Vaccine; Pune Virology Latest Coronavirus Research Update

यासाठी लस आहे आवश्यक:NIV च्या संशोधनात खुलासा, लस घेणाऱ्यांना डेल्टा व्हेरिएंटमुळे मृत्यूचा धोका 99% टक्के होतो कमी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लसीकरणानंतर संसर्ग झालेल्यांपैकी केवळ 9.8% लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली

सरकारपासून ते आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकजण लसीकरणास कोरोना संक्रमणाविरूद्ध सर्वात मोठे शस्त्र मानत आहे. हे बर्‍याच संशोधनातही सिद्ध झाले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी (NIV)ने लसीकरणाबाबत केलेल्या अभ्यासात अशीच काही माहिती समोर आली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, ही लस कोरोनाच्या सर्वात धोकादायक आणि वेगाने पसरणार्‍या डेल्टा व्हेरिएंटमुळे होणाऱ्या मृत्यूंपासून 99% पर्यंत संरक्षण देते. संशोधन रिजल्टवरुन असे दिसते की, लसीकरणानंतर संसर्ग झालेल्यांपैकी केवळ 9.8% लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली, तर केवळ 0.4% संक्रमितांचा मृत्यू झाला. जेव्हा लसीकरण झालेल्या व्यक्तीस कोरोनाचा संसर्ग होतो तेव्हा त्याला ब्रेकथ्रो इन्फेक्शन असे म्हणतात.

बर्‍याच नमुन्यांमध्ये डेल्टा प्रकार आढळला
लसीचा एक किंवा दोन्ही डोस मिळाल्यानंतरही लोकांना व्हायरसची लागण का होत आहे हे जाणून घेण्यासाठी वैज्ञानिकांनी अभ्यास केला. संशोधनासाठी गोळा केलेल्या बर्‍याच नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंटची पुष्टी झाली. खरेतर काही प्रकरणांमध्ये अल्फा, कप्पा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटही आढळली. NIV चे हे संशोधन लवकरच प्रकाशित होणार आहे.

सर्वाधिक 181 नमुने कर्नाटकातील तर सर्वात कमी 10 बंगालमधील आहेत
NIV च्या संशोधनात डेल्टा व्हेरिएंटची पहिली केस ऑक्टोबर 2020 मध्ये महाराष्ट्रातील विदर्भात आढळली. हा प्रकार कोरोनाच्या दुसर्‍या लाटेसाठी जबाबदार असल्याचे मानले जाते. संशोधनासाठी मार्च ते जून या कालावधीत महाराष्ट्रातून 53 नमुने घेण्यात आले. सर्वाधिक 181 नमुने कर्नाटकमधून तर सर्वात कमी 10 नमुने पश्चिम बंगालमधून घेण्यात आले. या नमुन्यांची अनुवांशिक क्रमवारी देखील व्हायरसचे प्रकार शोधण्यासाठी करण्यात आली.

जास्तीत जास्त तरुणांची सँपल घेण्यात आले, यामध्ये 65.1% पुरुष होते
अभ्यासासाठी, बहुतेक 31 ते 56 वयोगटातील लोकांचे नमुने घेण्यात आले होते. यापैकी 65.1% पुरुष होते. 71% रुग्णांमध्ये संसर्गाची लक्षणे जास्त होती. 69% मध्ये ताप (सामान्य लक्षणे) होती. संक्रमित 56% लोकांमध्ये डोकेदुखी आणि उलट्यांचा लक्षणे होती. 45% लोकांना कफ आणि 37% लोकांना घश्याचा त्रास होता.

लसीचा दुसरा डोस का आवश्यक आहे?
दुसर्‍या लाटेत आपण कोरोनाची भीषणता पाहिली. यात आपण पाहिले की, महामारी किती प्राणघातक असू शकते याचा अंदाज बांधणे कठीण आहे, परंतु त्याच वेळी तिसऱ्या लाटाचा सामना करण्याचे चांगले मार्ग देखील दुसऱ्या लाटेतून आपण शिकलो.

लसीकरण हा कोरोनाचा संसर्ग टाळण्याचा एकमात्र मार्ग आहे. त्यातही, लसीचा दुसरा डोस सर्वात महत्वाचा आहे. जोपर्यंत तुम्ही दोन्ही डोस घेत नाही तोपर्यंत तुम्ही संसर्गाच्या धोक्यापासून पूर्णपणे मुक्त झालेला नाहीत.

देशातील कोरोनाच्या तिन्ही लसी या डबल डोस लस आहेत. अशा परिस्थितीत, आपण लसीचा एक डोस घेतला असेल तर नक्कीच दुसरा डोस घ्या. कोव्हशील्डचा दुसरा डोस पहिल्या डोसच्या 12 आठवड्यांनंतर दिला जाईल. जर आपण कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला असेल तर तुम्ही 4 ते 6 आठवड्यांच्या काळात दुसरा डोस घेऊ शकता.

बातम्या आणखी आहेत...