आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने जगभर मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे जगभरात मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. परंतु, कोरोना लसीचा एक डोस व्हायरसच्या बीटा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटवर अकार्यक्षम असल्याचा दावा फ्रान्सच्या पाश्चर इन्स्टिट्यूटच्या ताज्या अहवालात केला गेला आहे. हा अहवाल प्रख्यात विज्ञान नियतकालिक नेचरमध्ये प्रकाशित करण्यात झाला आहे.
विशेष म्हणजे हा अहवाल अॅस्ट्राजेनेका आणि फायझर-बायोएनटेक लस घेतलेल्या लोकांवर तयार करण्यात आली आहे. भारतात ही लस सीरम इंन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोव्हिशील्ड नावाने तयार करत आहे. याउलट, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमधील रोगप्रतिकारक शक्तीने डेल्टा व्हेरिएंटला कमी केले आहे. हा शोध खूपच चांगला असल्याचे या रिसर्चच्या प्रमुखांचे म्हणणे आहे.
दोन्ही डोस घेणे खूप महत्वाचे
अहवालाच्या माहितीनुसार, अॅस्ट्राजेनेका आणि फायझर-बायोएनटेक लसीचे एक डोस घेतलेले 10 टक्के लोक कोरोना व्हायरसच्या अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंटला नष्ट करु शकले. तर दुसरीकडे दोन्ही डोस घेतलेल्या 95 टक्के लोकांनी या व्हेरिएंटला नष्ट केले आहे. त्यामुळे कोरोनाचे दोन्ही डोस घेणे खूपच महत्वाचे असल्याचे रिसर्चर्सचे म्हणणे आहे.
अॅस्ट्राजेनेका आणि फायझर तयार करीत आहे विशेष लस
कोरोना व्हायरसच्या या नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंटवर अॅस्ट्राजेनेका आणि फायझर दोन्ही मिळून एक विशेष लस तयार करत आहे. नुकतेच कंपनीने याची घोषणा केली आहे. या लसीचे ट्रायल ऑगस्ट महिन्यात सुरु होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
या व्हेरिएंटमुळे संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त
डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंट सर्वांसाठी चिंतेचा विषय असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट म्यूटेशननंतर अधिक धोकादायक असून याचे संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे हा व्हेरिएंट अल्फा व्हेरिएंटपेक्षा 60 टक्के तर कोरोनाच्या मुळ व्हेरिएंटपेक्षा दुपटीने म्हणजे 100 टक्के जास्त पसरतो.
हा व्हेरिएंट लवकरात लवकर फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो
काही तज्ञांच्या मते, कोरोनाचा हा नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंट बाधितांना लवकरात कमजोर करत असून रुग्णांच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो. व्हेरिएंटच्या या म्यूटेशनला K417N नाव देण्यात आले आहे. हा व्हेरिएंटनंतर बीटा आणि गॅमा व्हेरिएंटमध्ये मिसळतो. हा विषाणू इतर विषाणूपेक्षा मानवाच्या फुफ्फुसांपर्यंत लवकरात लवकर पोहोचत असल्याचे नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्यूनिझेशनचे (NTAGI) चे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा यांनी सांगितले आहे.
डेल्टा व्हेरिएंटपासून कसे वाचावे?
डब्ल्यूएचओने डेल्टा प्रकाराबद्दल दिली चेतावणी
जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या प्रकाराबद्दल चेतावणी दिली आहे. हा व्हेरिएंट इतर व्हेरिएंटपेक्षा जास्तच धोकादायक आणि संसर्गजन्य असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सगळ्याच देशांनी याला रोखण्यासाठी तयारी करण्यास सांगितले होते. कारण आधीच कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेमुळे अनेक देशाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.