आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Demand For Durga Murti At Kumhartoli In Kolkata Is At Pre covid Level, But Price 30% Lower Than 2019

भास्कर ग्राउंड रिपोर्ट:कोलकात्याच्या कुम्हारटोलीत दुर्गामातेच्या मूर्तींची मागणी कोविडपूर्वीच्या स्तरावर, पण किंमत 2019 पेक्षा 30% कमी

कोलकाता (कुंदनकुमार चौधरी/संदीप नाग)18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुर्गापूजेसाठी या वर्षी ८ ते २० फुटांपर्यंतच्या मूर्तींची मागणी

जुन्या कोलकात्याच्या शोभा बाजारपासून ५ मिनिटे चालत गेले की कुम्हारटोलीच्या अरुंद गल्ल्या सुरू होतात. तेथे गेल्यावर चोहीकडे दुर्गामातेच्या मूर्ती तयार करणारे कलाकार दिसतात. यंदा वेळ कमी आहे आणि ऑर्डर भरपूर आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे अर्ध्या मूर्तींची विक्री झाली नव्हती. या वर्षी २०१९ सारखी मागणी आहे. कुम्हारटोली मूर्ती शिल्प संस्कृती समितीचे सचिव बाबू पाल यांनी सांगितले की, गेल्या वर्षी ज्या मोठ्या मूर्ती विकू शकल्या नव्हत्या, त्यांचेही बुकिंग यंदा झाले आहे, पण किंमत ३०% कमी आहे. यंदा ८ ते २० फुटांच्या मूर्तींची जास्त मागणी आहे. कोलकात्याशिवाय देशभरातील मोठ्या शहरांतील पंडालच्या मूर्ती येथूनच जातात. सर्जनशीलतेसाठी प्रसिद्ध सोमेन पाल १९९८ पासून मूर्ती बनवत आहेत. यंदा त्यांनी ममतादीदी आणि सोनू सूदच्या विशेष मूर्ती डिझाइन केल्या आहेत. ते म्हणाले की, दीदींची मूर्ती ममतामयी तर सोनू सूदची मसीहा प्रतिमा असलेली मूर्ती बनवली आहे. दोन ठिकाणांहून त्यांची ऑर्डर मिळाली आहे. यंदा मागणी तर आहे, पण किंमत कमी आहे. २०१९ मध्ये १ लाख ते ३.५ लाख रु.पर्यंतच्या मूर्ती विकल्या होत्या, यंदा ६० हजार ते १.२० लाख रु. पर्यंतच्याच मूर्तींचे बुकिंग आहे. मूर्ती खरेदीसाठी आलेले सुभाष बॅनर्जी यांनी सांगितले की, यंदा देणगी कमी मिळाली आहे, त्यामुळे स्वस्त मूर्ती शोधत आहोत.

सर्वात मोठी आणि महाग मूर्ती ब्रिटनला मागवतात लक्ष्मी मित्तल
येथील मूर्ती अमेरिका, ब्रिटन, रशियासह अनेक देशांत पाठवल्या जातात. मूर्तिकार प्रद्युत पाल यांनी सांगितले की, मातीच्या मूर्ती तुटत असल्याने २००४ पासून फायबरच्या मूर्ती विदेशात पाठवणे सुरू केले. विमानाने, जहाजाने मूर्ती पाठवल्या जातात. स्टील किंग लक्ष्मी मित्तल सर्वात मोठी आणि महाग मूर्ती ब्रिटनला मागवतात. त्याचा शिपिंग चार्जच २ लाखांपर्यंत आहे.

उलबेलिया येथील माती मूर्तीसाठी सर्वात चांगली
संजय पाल म्हणाले, खरगपूरजवळील उलबेलिया येथील माती मूर्तीसाठी सर्वात चांगली मानली जाते. पूर्वी वेश्यालयाच्या अंगणातील माती आणून मूर्ती तयार केली जात होती. अशी अाख्यायिका आहे की, देवीने देहविक्रय करणाऱ्या एका भक्त महिलेस “तुझ्या अंगणातील मातीपासून माझी मूर्ती घडवली जावी,’असा वर दिला होता. पण आता ही परंपरा खंडित झाली.

बातम्या आणखी आहेत...