आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Demand From Rural Areas Will Support The Economy: Citigroup, Better Performance Of Rural Areas Than Cities In Many Respects

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दैनिक भास्करशी विशेष कारारांतर्गत:ग्रामीण भागातून येणाऱ्या मागणीमुळे अर्थव्यवस्थेला मिळेल आधार : सिटी ग्रुप

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक मापदंडांमध्ये शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागाची चांगली कामगिरी

काेराेनाच्या काळात ग्रामीण भागातून येत असलेल्या मागणीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला माेठा अाधार मिळू शकताे. चांगला मान्सून, उत्कृष्ट शेती उत्पादन व गावांना मिळणाऱ्या सरकारी मदतीच्या बळावर शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात चांगली सुधारणा हाेऊ शकते, असा अंदाज सिटी ग्रुपच्या एका विश्लेषणात व्यक्त करण्यात अाला अाहे.

ट्रॅक्टर, दुचाकी वाहने व खतांच्या विक्रीत झालेल्या वाढीवरून भारतातील गावे शहरांच्या तुलनेत चांगली कामगिरी करत असल्याचे विश्लेषणात म्हटले अाहे. सरकारने मार्चपासून अातापर्यंत विविध प्रकारच्या मदतीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेत १.५ लाख काेटी रुपयांचा निधी अाणळा. त्यामुळे गावांमध्ये वेगाने सुधारणा हाेत असल्याचे सिटी ग्रुपचे भारतातील मुख्य अर्थतज्ज्ञ समीरण चक्रवर्ती यांनी अहवालात म्हटले अाहे. मेमध्ये ट्रॅक्टरची विक्री वार्षिक अाधारावर ०.५ टक्क्यांनी वाढली अाहे. राेखीच्या व्यवहारात मार्चपासून अातापर्यंत २७५ टक्के वाढ झाली अाहे.

१२५ जिल्ह्यांवर खर्च हाेणार ५० हजार काेटी

शहरातून गावात परतलेल्या कामगारांसाठी सरकारने राेजगाराच्या संधी देण्याचा प्रयत्न केला. जवळपास ५० हजार काेटी रुपये पुढील १२५ दिवसांमध्ये काही निवडक जिल्ह्यावर खर्च करण्यात येणार अाहेत. माेठ्या संख्येने परतलेल्या प्रवासी मजुरांचे हे जिल्हे अाहेत. ही रक्कम आधीपासून मंजूर झालेल्या रकमेतून आहे की स्वतंत्र तरतूद केलेली आहे हे अद्याप ठरलेले नाही, असे चक्रवर्ती यांनी अहवालात म्हटले अाहे.

बातम्या आणखी आहेत...