आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Demand Of A Woman In Gujarat Motherhood Is Required From The Sperm Of A Dying Husband, Allow Me; The High Court Also Gave Its Approval; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:गुजरातेत महिलेची मागणी- मृत्युशय्येवरील पतीच्या स्पर्मपासून मातृत्व हवंय, मला परवानगी द्या; हायकोर्टानेही दिली मान्यता

अहमदाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑक्टोबरमध्ये झाले होते शुभमंगल, मेमध्ये कोरोना झाल्यापासून पती व्हेंटिलेटरवर

‘माझा पती मृत्युशय्येवर आहे. मला त्याच्या स्पर्मपासून मातृत्वाचे सुख उपभोगायचे आहे. परंतु वैद्यकीय कायदा परवानगी देत नाही. आमच्या प्रेमाची शेवटची आठवण म्हणून मला पतीच्या अंशाच्या रूपाने त्याचे स्पर्म देण्याची कृपा करा. डॉक्टरांच्या मते, माझ्या पतीकडे अत्यंत कमी वेळ आहे. तो व्हेंटिलेटरवर आहे.’ मंगळवारी गुजरात हायकोर्टासमोर हे प्रकरण सुनावणीस आले आणि दोनसदस्यीय पीठही स्तब्ध झाले.

प्रेमाची पराकाष्ठा आणि कायद्याच्या श्रेष्ठत्वाचा संगम म्हणून या प्रकरणात महिलेला तिच्या प्रेमाची शेवटची आठवण म्हणून पतीचे स्पर्म घेण्यास मान्यता देण्यात आली. या दांपत्याचे लग्न ऑक्टोबर २०२० झाले होते. पत्नी काय म्हणाली, तिच्याच तोंडून ऐका...

डॉक्टरांनी ‘मेडिको लीगल केस’ सांगत पतीच्या मंजुरीशिवाय स्पर्म देण्यास स्पष्ट नकार दिला होता
कॅनडात ४ वर्षांपूर्वी आम्ही भेटलो होतो. ऑक्टोबर २०२० मध्ये लग्न केले. त्यानंतर चारच महिन्यांनी भारतातील माझ्या सासऱ्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे कळाल्याने त्यांच्या सेवेसाठी फेब्रुवारी २०२१ मध्ये मी पतीसोबत मायदेशी परतले. आम्ही दोघे त्यांची देखभाल करत होतो. याचदरम्यान माझ्या पतींना कोरोना संक्रमण झाले. उपचारही घेतले, पण १० मेपासून त्यांची तब्येत गंभीर झाल्याने वडोदरा येथील एका खासगी रुग्णालयात भरती केले. त्यांची तब्येत सातत्याने नाजूक होत गेली. फुप्फुसे संक्रमित होऊन ती निष्क्रिय झाली.

माझे पती दोन महिन्यांपासून व्हेंटिलेटरवर मृत्यूशी संघर्ष करीत आहेत. तीन दिवसांपूर्वी डॉक्टरांनी माझ्या सासू-सासऱ्यांना बोलावून सांगितले की त्यांची तब्येत सुधारण्याची शक्यता मावळली आहे. त्यांच्याकडे जास्तीत जास्त तीन दिवसच उरलेत. हे ऐकून आम्ही सुन्न झालोत. मी स्वत:ला सावरले आणि डॉक्टरांना सांगितले की मला माझ्या पतीच्या अंशाच्या रूपात मातृत्व धारण करायचे आहे. यासाठी मला त्यांच्या स्पर्मची गरज आहे. डॉक्टरांनीही आमच्या प्रेमाविषयी सन्मान दाखवला. परंतु ‘मेडिको लीगल अॅक्ट’नुसार पतीच्या सहमतीशिवाय त्याचे स्मर्म सॅम्पल घेऊ शकत नाही, असे कळवले. खूप विनंती करूनही डॉक्टरांनी असमर्थता दर्शवली. मीही हार मानणारी नाही. मला सासू-सासऱ्यांची साथ मिळाली.

आम्ही तिघांनी गुजरात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला. आम्ही हायकोर्टात जाण्याची तयारी करत असताना डॉक्टरांनी मला तुमच्या पतीकडे केवळ २४ तासच उरलेत, असे सांगितले. आम्ही सोमवारी सायंकाळीच याचिका दाखल करत दुसऱ्याच दिवशी सुनावणी घेण्याचा आग्रह धरला. मंगळवारी सुनावणीदरम्यान १५ मिनिटांतच आम्हाला निर्णय मिळाला. पण रुग्णालयाकडून आम्ही कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास करत असल्याचे सांगितले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...