आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Demands For Discussion On Conflict In Tawang; Govt Should Answer About Border: Saenia Gandhi

तवांगमधील संघर्षावर चर्चेची मागणी:सरकारने  सीमेबद्दल उत्तर द्यावे -  साेनिया गांधी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संसदेत बुधवारी विरोधी पक्षांनी तवांगमधील चिनी घुसखोरीवरून केंद्र सरकारला घेरले. जनता आणि संसदेला सीमेवरील खऱ्या परिस्थितीबद्दल काहीही माहिती मिळत नाही, असे काँग्रेसच्या माजी अध्यक्ष साेनिया गांधी यांनी म्हटले आहे. सरकार अडून आहे. चीनच्या अतिक्रमणावर संसदेत चर्चा घडवून आणली जात नाही. साेनियांसह काँग्रेसच्या समविचारी १२ विराेधी पक्षांनी बुधवारी संसद परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमाेर धरणे आंदाेलन केले. सरकारने चीनच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करावी, असा आग्रह करण्यात आला. चीनने सीमेवर केलेले अतिक्रमण गंभीर विषय ठरताे. साेनिया म्हणाल्या, या गंभीर प्रश्नी सरकार उत्तर का देत नाही? संसदेत चीनवर चर्चा न करणे लाेकशाहीचा अपमान ठरताे. संपूर्ण देश लष्कराच्या पाठीशी आहे. देशाचे सैनिक कठीण परिस्थितीत हल्ले परतवून लावतात. तत्पूर्वी काँग्रेसचे मनीष तिवारी, मनिकम टागाेर यांनी लाेकसभेत चीन सीमावादावर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली. विराेधकांना अधूनमधून गांधींची आठवण येते. काँग्रेसच्या कार्यकाळात देशाची किती जमीन गमवावी लागली हाेती, हे लक्षात घेतले पाहिजे. ९ डिसेंबर राेजी अरुणाचलच्या तवांग क्षेत्रात भारत व चिनी सैनिकांत धुमश्चक्री झाली हाेती. त्यावरून विराेधी पक्ष सातत्याने केंद्राला लक्ष्य करू लागला आहे.

वीज कंपन्यांवर १ लाखाची थकबाकी : वीज मंत्री आर.के. सिंह संसदेत म्हणाले, वीज वितरण कंपन्यांकडून वीज खरेदीची थकबाकी २९ हजार ८५७ कोटी रुपयांहून कमी झाली आहे. ती आता १.०८ लाख कोटी राहिली आहे. जूनमध्ये ही थकबाकी १.३७ लाख कोटी होती.

बातम्या आणखी आहेत...