आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दमनचक्र:म्यानमारच्या ‘राष्ट्रपित्या’स रुचली नाही लाेकशाही; दशकानंतर पुन्हा तख्तपालट, देशाचे पहिले उपाध्यक्ष काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वत:ला राष्ट्रपिता संबोधणाऱ्या लष्कराची वर्षभरासाठी आणीबाणी लागू

भारताचा शेजारी देश म्यानमारमध्ये दशकभराच्या लोकशाहीनंतर लष्कराने पुन्हा तख्तपालट करून सत्ता काबीज केली. स्वत:ला राष्ट्रपिता म्हणवून घेणाऱ्या म्यानमारच्या लष्करास आँग सान स्यू की यांना मिळालेले बहुमत सहन झाले नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत स्यू की यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीने (एनएलडी) बहुमत संपादन केले होते. एनएलडीला ८० टक्क्यांहून जास्त जागा मिळाल्या होत्या.

लष्कराने सोमवारी पहाटे देशाच्या स्टेट कौन्सिलर आँग सान स्यू की, अध्यक्ष यू विन मिंट यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते व अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. देशात पुढील वर्षासाठी आणीबाणी लागू करण्यात आली आहे. लष्कराच्या टीव्ही वाहिनीच्या मते, लष्कराने देशावर ताबा घेतला आहे. देशाची सत्ता आता कमांडर-इन-चीफ ऑफ डिफेन्स सर्व्हिसेस मिन आँग हाइंग यांच्या हाती राहील. देशाचे पहिले उपाध्यक्ष माइंट स्वे यांना कार्यवाहक अध्यक्ष बनवण्यात आले आहे.

५० वर्षांनी २०११ मध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना
म्यानमारमध्ये २०११ मध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना झाली होती. त्याच्या आधी सुमारे ५० वर्षे देशात हुकूमशाही होती. आँग सान स्यू की यांनी लोकशाहीच्या स्थापनेसाठी संघर्ष केला होता.त्या १५ वर्षे कैदेत होत्या.

भारतासह अनेक देशांच्या नेत्यांची सुटकेची मागणी
भारत, अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांनी म्यानमारमध्ये तख्तपालटाच्या घटनेचा निषेध केला आहे. अटकेतील नेत्यांची तत्काळ सुटका करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

आणीबाणी संपल्यानंतर निवडणूक : लष्कर
लष्कर म्हणाले, एक वर्षाच्या आणीबाणीनंतर निवडणूक होणार आहे. आयोगाच्या नियमांत सुधारणा केल्या जातील. एनएनडी निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे बहुमतात निवडून आल्याचाही लष्कराने आरोप केला आहे.

दुसऱ्यांदा बहुमतामुळे लष्करात घबराट
म्यानमारमध्ये अचानक झालेल्या तख्तपलटावर तज्ञ हैराण आहेत. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरचे एशिया रिसर्चचे प्रमुख गेरार्ड मॅकार्थी म्हणाले, देशातील सध्या व्यवस्था लष्करासाठी खूप फायद्याची आहे. लष्कराचा सरकारवर अंकुश आहे. परदेशी गुंतवणूक येत आहे. सैन्याला युद्ध गुन्हेगारीच्या बाबत राजकीय संरक्षण होते. त्याशिवाय आँग सान स्यू की यांच्या पक्षाला मिळालेले बहुमत हा देखील सैन्यासाठी चिंतेचा होता. स्यू की यांची सातत्याने वाढणारी लोकप्रियता हा सैन्याला धोक्याचा विषय वाटत होता. म्हणूनच एक वर्षासाठी आणीबाणी लागू करण्यात आली आहे. म्यानमारमधील घडामोडींकडे आशियातील देशांचे लक्ष लागले आहे. भारतही नजर ठेवून आहे.

बातम्या आणखी आहेत...