आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Demonetisation Decision Wrong, Demonetisation Makes A Mockery Of The Law : P. Chidambaram Said

पी. चिदंबरम म्‍हणले:नोटबंदीचा निर्णय चुकीचा, नोटबंदीमुळे कायद्याची खिल्ली

नवी दिल्ली5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोटबंदीचा निर्णय चुकीचा होता. केंद्र सरकार स्वत:हून नोटबंदीचा निर्णय घेऊ शकत नाही तसेच तसा प्रस्तावही देऊ शकत नाही. रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाच्या शिफारस असेल तरच असा निर्णय घेतला जाऊ शकतो, असा युक्तिवाद गुरुवारी माजी अर्थमंत्री तथा ज्येष्ठ विधिज्ञ पी. चिदंबरम यांनी नोटबंदी याचिकेवरील सुनावणी प्रसंगी केला.

ज्या पद्धतीने नोटबंदी केली ती कायद्याची खिल्ली उडवणारी ठरली आहे. नोटबंदीविषयक महत्त्वाचे दस्तऐवजही केंद्र सरकारने जाहीर केले नाहीत त्यामुळे अशी निर्णय प्रक्रियाच बंद झाली पाहिजे अशा शब्दांत चिदंबरम यांनी केंद्रावर टीका केली.

बातम्या आणखी आहेत...