आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Deora, Jitin Prasad's Lead Role In Pilot's Homecoming, Rahul Pilot Meeting Made By Youth

इनसाइड स्टोरी:पायलट यांच्या घरवापसीत देवरा, जितिन प्रसाद यांच्या प्रमुख भूमिका, युवकांनी घडवली राहुल-पायलट भेट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकार पाडण्यात वसुंधरांनी भाजपला साथ दिली नाही

पायलट यांच्या राहुल व प्रियंका भेटीत युवा ब्रिगेडची भूमिका महत्त्वाची राहिली. वेणुगोपाल व चिदंबरमसारख्या ज्येष्ठांनीही पाठिंबा दिला. युवा नेते व राहुल यांची टीम गुप्तपणे पायलट यांच्या संपर्कात होती. पायलट व गहलोत यांच्यातील वादावर युवा नेते खुश नव्हते. युवा ब्रिगेडने ही गोष्ट राहुल यांच्यासमोर मांडली. यात राहुल यांचे निकटवर्तीय दीपेंद्र हुड्डा, भंवर जितेंद्र सिंह, मिलिंद देवरा, जितिन प्रसाद यांचा समावेश होता. राहुल यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर भंवर जितेंद्र सिंह व दीपेंद्र यांनी पायलट यांच्याशी चर्चा केली. तडजोडीचा फॉर्म्युला तयार करण्यात वेणुगोपाल व अहमद पटेल यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. सूत्रांनुसार, गहलोत यांच्या वक्तव्यांमुळे पायलट नाराज होते. मात्र, पक्षाची दारे खुली राहावीत म्हणून युवा ब्रिगेडच्या सल्ल्यावर शांत राहिले.

सरकार पाडण्यात वसुंधरांनी भाजपला साथ दिली नाही
काँग्रेसमधील बंडानंतर भाजप सरकार स्थापण्याची संधी शोधत होता. मात्र, माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे या प्रकरणात शांत राहिल्या. त्यांनी स्पष्ट केले की, बंडखोरांच्या मदतीने काँग्रेस सरकार पाडण्याच्या मनसुब्यांत त्या साथ देणार नाहीत. भाजपने या मुद्द्यावर चर्चेसाठी बैठक बोलावली होती, मात्र वसुंधरा आल्या नाहीत. पक्षाला ही बैठक रद्द करावी लागली. सूत्रांनुसार भाजपचे ७२ पैकी ४५ आमदार वसुंधरा समर्थक असल्याने त्यांचे सहकार्य आवश्यक होते.

बातम्या आणखी आहेत...