आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Department Of Education Fails In 'Read To Me' Initiative, Number Of People Downloading English App

दिव्य मराठी विशेष:‘रीड टू मी’ उपक्रमात शिक्षण विभाग नापास, इंग्रजीचे ज्ञान देणारे मोबाइल ॲप डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी

मंगेश शेवाळकर | हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेले “रीड टू मी’ हे मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करण्यात मराठवाड्यातील शिक्षण विभाग नापास झाल्याचे चित्र आहे. सर्वच जिल्ह्यांतील शिक्षण विभागाची कामगिरी असमाधानकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे औरंगाबाद येथील प्रादेशिक विद्या प्राधिकरणाने यासंदर्भात शिक्षण विभागांना पत्र पाठवून पुढील शैक्षणिक वर्षात हे ॲप डाऊनलोड करून त्याचा विद्यार्थ्यांना लाभ करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात महाराष्ट्र शासन व इंग्लिश हेल्पर दिल्ली या संस्थेमध्ये रीड टू मी या उपक्रमासंदर्भात मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात करार झाला होता. त्यानुसार राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाचे शिक्षण घेणे सोपे जावे तसेच या विषयातील कमी गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन शिक्षण घेता येऊन त्यांच्यात इंग्रजी विषयामध्ये आवड निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी हे ॲप मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ॲपसंदर्भात शिक्षण विभागाने जास्तीत जास्त जागृती करून विद्यार्थ्याच्या पालकांशी संपर्क साधून त्यांच्या मोबाइलवर हे ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर विद्यार्थ्यांसाठी करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. तसेच इंग्रजी विषयाच्या अध्यापन-अध्ययनासाठी शाळा प्रवेशाचे सॉफ्टवेअर स्वरूपातही उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र हे ॲप डाऊनलोड करण्याचे काम असमाधानकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यार्थी संख्या व ॲप डाऊनलोड केलेले लोक 62,000

या ॲपमध्ये असणाऱ्या सुविधा
या ॲपमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतची पाठ्यपुस्तके उपलब्ध करण्यात आली असून यासोबतच शाब्दिक व चित्रमय शब्दकोश, ऑडिओ स्वरूपात पाठ्यपुस्तके, इंग्रजी शब्दांचे ठळकपणे स्पेलिंग, शब्दांचा आकार लहान-मोठा करता येेणे यासोबतच वाचनाचा वेग कमी-जास्त करण्याची सुविधा आहे.

बातम्या आणखी आहेत...