आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Deputy SP Demoted I Yogi Government Action I Video Of Taking A Bribe To Suppress A Rape Case Went Viral I Latest News 

लाचखोर डेप्यूटी SPला बनवले इन्स्पेक्टर:योगींची धडक कारवाई; बलात्काराचे प्रकरण मिटविण्यासाठी 5 लाख घेतले होते

लखनऊएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने लाचखोरी प्रकरणातील एका अधिकाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे. जालौन जिल्ह्यातील पीटीसी शाखेत तैनात डेप्युटी एसपी विद्या किशोर शर्मा यांची पदावनती करून त्यांना उपनिरीक्षक (ड्रॉगा) बनविण्यात आले आहे. गेल्यावर्षी शर्मा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते बॅगेत नोटांचे बंडल घेऊन जाताना दिसले होते. हा व्हिडिओ रामपूरमध्ये डेप्युटी एसपी पदावर असतानाचा होता.

सामूहिक बलात्काराचे प्रकरण लपवण्यासाठी डेप्युटी एसपी विद्या किशोर शर्मा यांनी 5 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. तपासात त्यांच्यावरील आरोपांची सिद्धता झाली. त्यानंतर त्यांना निलंबीत करण्यात आले होते. तर योगी सरकारने सदर अधिकाऱ्याला पुन्हा कामावर रूजू करून घेतले. परंतू त्याची पदावनती केल्याने अधिकाऱ्यांची मोठी नामुष्की झाली आहे. या कारवाईबाबतची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट द्वारे दिली आहे. विद्या किशोर शर्मा यांच्या पदावनतीची माहिती दिली आहे.

जालौन जिल्ह्यातील पीटीसी शाखेत तैनात असलेले विद्या किशोर शर्मा यांच्यावर सामूहिक अत्याचार प्रकरण दाबण्यासाठी 5 लाखांची लाच घेतल्याचा आरोप आहे. तपासात त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले होते.
जालौन जिल्ह्यातील पीटीसी शाखेत तैनात असलेले विद्या किशोर शर्मा यांच्यावर सामूहिक अत्याचार प्रकरण दाबण्यासाठी 5 लाखांची लाच घेतल्याचा आरोप आहे. तपासात त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले होते.

संपूर्ण प्रकरण काय होते

9 सप्टेंबर 2021 रोजीची ही घटना आहे. रामपूरमधील एका महिलेने आरोप केला की, तिच्यावर रुग्णालयाचे संचालक विनोद यादव आणि तत्कालीन निरीक्षक रामवीर यादव यांनी सामूहिक बलात्कार केला. तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यानंतर रामपूरच्या डेप्युटी एसपी विद्या किशोर शर्मा हे लाच घेतानाचा व्हिडिओ समोर आला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी रामवीर यादव आणि हॉस्पिटल ऑपरेटर विनोद यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

डिसेंबर 2021 मध्ये झाले होते निलंबन

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विद्या किशोर शर्मा यांना डिसेंबर 2021 मध्ये निलंबित करण्यात आले होते. यानंतर त्यांना डीजीपी कार्यालयात समाविष्ट करण्यात आले. सरकारच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास एएसपी मुरादाबाद यांच्याकडे सोपवण्यात आला होता. चौकशीत विद्या किशोर शर्मा यांच्यावर लाच घेतल्याचे आरोप निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना पदमुक्त करण्यात आले होते.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरून कारवाईची माहिती देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरून कारवाईची माहिती देण्यात आली आहे.

RTI कार्यकर्त्याने केली होती तक्रार
विद्या किशोर शर्मा हे रामपूरमधील दोन वर्षांच्या काळात कायमच चर्चेत राहीले आहे. 5 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतरही खुद्द मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. आता पुन्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करत त्यांना मूळ पदावर पाठवले आहे. त्यांच्याविरूद्ध भ्रष्टाचाराची तक्रार आरटीआय कार्यकर्ते दानिश खान यांनी केंद्रीय दक्षता आयोग व मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

व्हिडिओमध्ये एक बॅग दिसत आहे. ज्यामध्ये नोटांचे बंडल आणून डेप्युटी एसपीला दिले होते.
व्हिडिओमध्ये एक बॅग दिसत आहे. ज्यामध्ये नोटांचे बंडल आणून डेप्युटी एसपीला दिले होते.

पुन्हा डेप्युटी एसपी होण्यासाठी 12 वर्षे लागतील
शर्मा हे निरीक्षक पदावरून पोलिस दलात रुजू झाले होते. सद्या ते निलंबित आहेत. आता त्यांचे निलंबन मागे घेतल्यावर त्यांना निरीक्षक पदावर रुजू करून घेतले जाईल. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शर्मा यांना इन्स्पेक्टर ते डेप्युटी एसपी बनण्यास 10 ते 12 वर्षे लागू शकतात.

यापूर्वीही यूपीमध्ये डेप्युटी एसपीची पदावनती झाली होती
यूपीमध्ये पोलीस दलात पदावनतीची ही पहिलीच घटना नाही बर का. यापूर्वी देखील हॉटेलमध्ये लेडी कॉन्स्टेबलसोबत दंगल साजरी करणाऱ्या डेप्युटी एसपी कृपाशंकर कन्नोजिया यांचीही पदावनती करण्यात आली होती. ही बात 8 जुलै 2021 ची आहे.

डेप्युटी एसपी कृपाशंकर कन्नोजिया आणि महिला कॉन्स्टेबलचे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले छायाचित्र.
डेप्युटी एसपी कृपाशंकर कन्नोजिया आणि महिला कॉन्स्टेबलचे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले छायाचित्र.

कन्नोजिया हे उन्नावमध्ये डेप्युटी एसपी म्हणून तैनात होते. घरी जाण्यासाठी त्यांनी तीन दिवसांची रजा घेतली होती. मात्र, ते घरी पोहोचले नाही. त्यांच्या पत्नीने एसपीकडे तक्रार केली. कन्नोजियाचे लोकेशन ट्रेस केले असता तो कानपूरमधील मॉल रोडवरील एका हॉटेलमध्ये असल्याचे समजले.

पोलिस हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा तेथे डेप्युटी एसपी आणि लेडी कॉन्स्टेबलच्या नावाने एक रूम बुक करण्यात आली होती. दोघेही इथे सेलिब्रेशन करत होते. यानंतर दोघांना निलंबित करण्यात आले. नंतर डेप्युटी एसपीची पदावनती करून इन्स्पेक्टर बनवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...