आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबमध्ये एका डेरा प्रेमीची हत्या झाल्यानंतर हरियाणात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सरकारने गुप्तहेर व सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिलेत. डेऱ्याचा प्रभाव असणाऱ्या CM सिटी कर्नाळसह 7 जिल्ह्यांतील पोलिसांनाही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आलेत. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसली तर कठोर कारवाई करण्याचे सरकारचे आदेश आहेत.
डेरा प्रेमींवर खास नजर
सुरक्षा यंत्रणांसह गुप्तहेर व हरियाणा पोलिसांना डेरा प्रेमींच्या सर्वच हालचालींवर नजर ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. सरकारने राज्यातील डेऱ्याच्या प्रभावामुळे अलर्ट राहण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सिरसा, फतेहाबाद, जींद, अंबाला, कुरुक्षेत्र, कर्नाळ व कॅथल जिल्ह्यात डेऱ्याचा सर्वाधिक प्रभाव आहे.
CM घेत आहेत अपडेट
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर या प्रकरणी प्रत्येक क्षणाची अपडेट घेत आहेत. त्यांनी राज्याच्या उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांना कायदा सुव्यवस्थेची खास काळजी घेण्याचे निर्देश दिलेत. त्यांनी या प्रकरणी कठोर पाऊल उचलण्याचीही सूचना केली आहे.
10 ऑक्टोबर रोजी झाली होती हत्या
पंजाबच्या फरीदकोटमध्ये 10 ऑक्टोबर रोजी सकाळी डेरा प्रेमी प्रदीपची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. डेरा सच्चा सौदाने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत एक निवेदन जारी केले होते. त्यात डेरा प्रवक्ते वकील जितेंद्र खुराना इंसान व संदीप कौर इंसान यांनी पीडित कुटुंबीयांप्रती शोक संवेदना व्यक्त केली होती.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
डेरा सच्चा सौदात सर्वच धर्मांचा मान सन्मान राखला जातो. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई केली जावी. डेरा प्रेमींनी शांतता राखावी, असे आवाहन डेऱ्याच्या प्रवक्त्याने केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.