आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dera Sacha Sauda Follower Shot Dead In Punjab Attackers Came On Bike In Faridkot

डेरा सच्चा सौदाच्या अनुयायाची पंजाबात गोळ्या घालून हत्या:फरीदकोट येथे दुचाकीवरून आले होते हल्लेखोर

फरीदकोट4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबच्या फरीदकाेटमध्ये दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी डेरा सच्चा साैदाचा अनुयायी प्रदीप सिंह ऊर्फ राजूची गोळी घालून हत्या केली. त्याच्यावर २०१५ मध्ये बरगारी येथे श्री गुरुग्रंथसाहिबचा अपमान केल्याचा आरोप होता. या हल्ल्यात सुरक्षा रक्षकासह ३ जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी घडली.

हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. सुरक्षा रक्षकांनीही प्रत्युत्तरात फायरिंग केली. घटनेनंतर अमेरिकेमध्ये बसलेला गँगस्टर गाेल्डी बराडने आपल्या टि्वटर हँडलवर या घटनेची जबाबदारी घेतली आहे. प्रत्यक्षदर्शींनुसार, डेअरी आणि किराणा दुकान चालवणारा प्रदीप सिंह दुकानामध्ये येताच त्याच्यावर हल्ला करण्यात आला.

सुरक्षेत चूक, २ रक्षकांपैकी एक ड्यूटीवर आलाच नाही प्रदीप कुमारचे वडील साधू सिंह यांनी सांगितले, रात्री ड्यूटीवर असलेला होमगार्डचा जवान सकाळी ड्यूटी संपल्यानंतर निघून गेला. दुसरा हाेमगार्ड हाकम सिंह ड्यूटीवर आला. त्याच्यासोबत दोन बंदूकधारी चालत असत, पण आज दुसरा बंदूकधारी आला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...