आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अयोध्या:अयोध्येत मशिदीची डिझाइन तयार, धन्नीपूरमध्ये होणार मशीद, 100 कोटींचे रुग्णालय

अयोध्या7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन हजार लोक प्रार्थना करतील अशी व्यवस्था

अयोध्येतील धन्नीपूरमध्ये प्रस्तावित मशिदीचे डिझाइन शनिवारी जाहीर झाले. इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनने व्हर्च्युअल बैठकीत डिझाइन जारी केले. मशिदीला घुमट नसेल. मशिदीचे नाव कोणत्याही बादशहाच्या नावावर ठेवले जाणार नाही, असे ठरले. मशिदीच्या परिसरात संग्रहालय, ग्रंथालय आणि एक कम्युनिटी किचनही तयार केले जाणार आहे. २०० ते ३०० खाटांचे एक रुग्णालयही असेल.नकाशा वेळेवर पूर्ण झाल्यास २६ जानेवारीपासून मशिदीच्या बांधकामाला सुरुवात होऊ शकते, असे फाउंडेशनच्या सूत्रांनी सांगितले. या प्रक्रियेत विलंब झाल्यास १५ ऑगस्टला बांधकाम सुरू होईल. संपूर्ण प्रकल्प दोन वर्षांत साकारला जाण्याची अपेक्षा आहे. साइटवर आधी माती परीक्षण केले जाईल. त्यानंतर नकाशा मंजूर केला जाणार आहे. या प्रक्रियेनंतर बांधकाम प्रत्यक्षात सुरू होईल. मशिद, रुग्णालय, संग्रहालयाचे काम एकाचवेळी सुरू होईल. रुग्णालयावर १०० कोटी रुपये खर्च येऊ शकतो. ते चार मजली असेल.

दोन हजार लोक प्रार्थना करतील अशी व्यवस्था
अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे वास्तु विभागाचे अधिष्ठाता व मशिदीचे डिझाइन तयार करणारे एम. एस. अख्तर म्हणाले, मशीद ३५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर तयार होईल. येथे एकाच वेळी २ हजार लोक नमाज अदा करू शकतील. मशिदीचे दोन मजले असतील. यात महिलांसाठी स्वतंत्र जागा असेल. इमारती इको-फ्रेंडली असेल आणि त्यात सौर ऊर्जेचाही वापर केला जाईल. रुग्णालयाला २४ हजार १५० चौरस मीटरमध्ये उभारले जाईल. मशीद सहा महिन्यांत तयार होईल आणि रुग्णालयासाठी वर्ष लागू शकते. मशिदीचे नाव कोणत्याही बादशहाच्या नावावर नसेल. रुग्णालयामुळे गरीब रुग्णांवर वेळेवर व दर्जेदार उपचार होऊ शकतील. त्यातून समाजातील उपेक्षित घटकांना मदत होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...