आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Despite Lower Crude Oil Prices, Oil Companies Have Hiked Petrol diesel Prices Per Liter; News And Live Updates

खेळ:कच्च्या तेलाचे भाव कमी होऊनही तेल कंपन्यांनी लिटरमागे वाढवल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्रूडचे भाव वाढले, पेट्रोल-डिझेलचे नाही, कारण निवडणुका होत्या

गेल्या महिन्यापेक्षाही कमी कालावधीत तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सलग १७ वेळा वाढवून त्या लिटरमागे अनुक्रमे ४.९० रुपये व ४.६५ रुपयांनी वाढवल्या अाहेत. मेमध्ये १६ वेळा किमती वाढवल्या. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात कच्च्या तेलाच्या (भारतातील) किमतीत २० रुपयांनी घट झाली. कच्च्या तेलाच्या किमती घटूनही तेल कंपन्यांची दरवाढ कायम अाहे.. एप्रिलमध्ये क्रूडची सरासरी किंमत प्रति बॅरल ४,७१८.६४ रुपये होती, जी मेमध्ये घसरून ४,६९९.३३ रुपयांवर आली.

नोंद : क्रूड तेलाचे भाव एक महिना आधीच्या किमतीनुसार निश्चित हाेतात
नोंद : क्रूड तेलाचे भाव एक महिना आधीच्या किमतीनुसार निश्चित हाेतात

तेल कंपन्यांनी ४ मेपासून पेट्राेल-डिझेलच्या किमती वाढवण्यास सुरुवात केली. त्याच्या उलट मार्च, एप्रिलमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत बॅरलमागे अनुक्रमे ३९६ व ३४३ रुपयांनी वाढ झाली. कारण फेब्रुवारीच्या अखेर निवडणूक अायाेगाने मार्च-एप्रिलमध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घाेषणा केली हाेती.

बातम्या आणखी आहेत...