आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Detained Priyanka Gandhi Asked Pm When Was The Person Who Crushed The Breadwinner Arrested?

प्रियांका वाड्रा यांचा पंतप्रधानांना प्रश्न:ताब्यात घेतलेल्या प्रियांका गांधींने विचारले - अन्नदात्याला चिरडणाऱ्याला अटक केव्हा? राहुल म्हणाले - जिला ताब्यात घेतले, ती घाबरत नाही

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आज म्हणजेच मंगळवारी सकाळी सोशल मीडियावर एक पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक प्रश्न विचारला आहे. पोस्टमध्ये शेतकऱ्यांना जीपने चिरडल्याचा कथित व्हिडिओ देखील आहे. प्रियांका म्हणाल्या, 'तुमच्या सरकारने मला कोणत्याही आदेशाशिवाय आणि एफआयआरशिवाय गेल्या 28 तासांपासून कोठडीत ठेवले आहे. अन्नदात्याला चिरडणाऱ्या व्यक्तीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. का?'
राहुल म्हणाले- जिला ताब्यात घेळते आहे, ती घाबरत नाही

प्रियंका गांधी रविवारी रात्री लखनऊ पोहोचल्या होत्या. लखीमपूर हिंसाचारात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी रात्री त्या बाहेर पडल्या. पोलिसांनी त्यांना सोमवारी पहाटे साडेपाच वाजता सीतापूरच्या हरगाव येथे थांबवून ताब्यात घेतले. त्यांना पीएसीच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले आहे.

प्रियंका यांना ताब्यात घेतल्यापासून कार्यकर्ते गेस्ट हाऊसच्या बाहेर जमले आहेत. सोमवारी संध्याकाळी मेणबत्त्या पेटवून प्रदर्शन झाले. आज सकाळपासून ते त्यांच्या सुटकेची मागणी करत सरकारविरोधात घोषणा देत आहेत. पोलिस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...