आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअर फंडा:मुलांमध्ये बहुआयामी व्यक्तिमत्व विकसित करा, Extra-curricular शिवाय जीवनात यश कदापी शक्य नाही

शिक्षणतज्ज्ञ, संदीप मानुधने24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

"कला शिक्षणाचे एक अनिवार्य तत्व आहे. जसे वाचन, लेखन व अंकगणित... संगीत, नृत्य, पेंटिंग व नाट्य या सर्वच गोष्टी मानवी समज व कर्तत्वाची दारे उघडणाऱ्या गुरुकिल्ल्या आहेत."-विल्यम बेनेट (अमेरिकेचे माजी शिक्षण सचिव)

करिअर फंडात स्वागत!

तुमची मुले/मुली आपल्या भविष्याविषयी खूप विचार करतात काय? तर एक गोष्ट लक्षात घ्या. लांबलचक शर्यतीत केवळ परीक्षेतील मार्क्स व स्पर्धा परीक्षा क्लिअर केल्याने काहीच होणार नाही. यासाठी गरज आहे विद्यार्थ्यांत अभ्यासाबरोबरच अभ्यासेतर आवड निर्माण करण्याची.

क्रिकेट संघातील कोणत्या खेळाडूवर आपण सर्वाधिक प्रेम करतो? हो बरोबर, अष्टपैलू खेळाडूंवर. सुनील गावस्करची स्लिपमधील फील्डिंग, सचिनची बॉलिंग व कपिल देवची बॅटिंग कोण विसरू शकतो.

अभ्यासक्रमेतर व सह-अभ्यासक्रम उपक्रम
"सह-अभ्यासक्रम उपक्रम" अभ्यासक्रमाच्या बाहेरचे असतात. ते अभ्यासक्रमाला पूरक असतात. उदाहरणार्थ, एखाद्या विषयाशी संबंधित प्रकल्प, वादविवाद, प्रश्नमंजुषा, सर्जनशील लेखन, शिकवल्या जात असलेल्या विषयांशी संबंधित भूमिका ,नाटके आदी.

अभ्यासक्रमेतर क्रियाकलाप म्हणजे ज्यांचा अभ्यासक्रमाशी कोणताही संबंध नसतो. उदाहरणार्थ, कलाकृती (गाणे, चित्रकला, संगीत) किंवा एखादा खेळ (उदा. टेबल टेनिस, लॉन टेनिस, क्रिकेट, फुटबॉल) आदी. आज आपण अभ्यासेतर उपक्रमांवर लक्ष केंद्रित करणार आहोत.

बुद्धिमत्ता किती प्रकारची

पालकांनी हे समजून घेतले पाहिजे की, बुद्धिमत्ता म्हणजे केवळ गणित व विज्ञानाचे प्रश्न सोडवणे किंवा सामाजिक अभ्यास लक्षात ठेवणे नव्हे. तज्ञ कोणत्याही व्यक्तीमध्ये 8 प्रकारची बुद्धिमत्ता पाहतात, जसे -
1) स्पेशिअल (spatial) इंटेलिजन्स - यात नमुने ओळखणे, व्हिज्युअल्सचा अर्थ लावणे, रेखाचित्र इत्यादींचा समावेश होतो.
2) कायनेस्थेटिक इंटेलिजन्स - यात शारीरिक हालचाल व मोटर कौशल्याचा समावेश होतो. उदाहरणार्थ, खेळांमध्ये निपुण असणे, कृती लक्षात ठेवण्यास सक्षम असणे, नृत्यासारख्या शारीरिक समन्वयाच्या गोष्टींमध्ये तरबेज असणे आदी.
3) म्युझिकल इंटेलिजन्स - यात ताल व संगीताचा वापर, संगीताच्या नोट्स आदींच्या ओळखीचा समावेश होतो.
4) लिंगविस्टिक इंटेलिजन्स - हे भाषा, शब्द व लेखणाशी संबंधित आहे.
5) लॉजिकल-मॅथेमॅटिकल स्किल्स - हे गणित व विज्ञानाशी संबंधित आहे.
6) इंटर-पर्सनल इंटेलिजन्स - यात स्ट्राँग इमोश्नल इंटेलिजन्स व मानवांतील परस्पर संबंधांशी संबंधित कौशल्यांचा समावेश होतो.
7) इंट्रापर्सनल इंटेलिजन्स - यात स्वतःत पाहण्याची क्षमता, स्वतःची ताकद व दुबळेपण समजून घेण्याची क्षमता, स्वतःच्या भावनांबद्दल संवेदनशील असणे आदींचा समावेश असतो.

8) नैसर्गिक बुद्धिमत्ता - निसर्गातील पॅटर्न्स व रिलेशन्स पाहण्याची क्षमता. यात वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र, बागकाम, कॅम्पिंग आदींचा यात समावेश होतो.

पालकांची भूमिका सर्वात महत्वाची -6 मोठे पॉइंट्स

1) लवकर सुरुवात करा - पालकांनी आपल्या मुलाला वर नमूद 8 बुद्धिमत्तांपैकी कोणत्या गोष्टीत रस असल्याचे समजल्यानंतर जास्त वेळ वाट पाहू नये. त्यांनी हळू-हळू त्या दिशेने काम सुरू करावे. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याची किनेस्थेटिक बुद्धिमत्ता चांगली असेल व त्याला नृत्यात रस असेल, तर त्याला उन्हाळ्याच्या सुट्टीत नृत्याच्या वर्गाला पाठवावे. त्याला पुढेही त्यासाठी मोटिव्हेट करावे.

2) योग्य वेळापत्रक - "तुम्ही योजना आखण्यात अपयशी ठरलात, तर तुम्ही अयशस्वी होण्याची योजना तयार करत आहात!" ही एक लोकप्रिय म्हण आहे. तुमच्या मुलाला एका दिवसात करायच्या असलेल्या सर्व क्रियाकलापांची यादी तयार करा. त्यानंतर रात्रीच्या जेवणासारखे एक निश्चित रुटीन आवश्यक असणाऱ्या ठराविक नित्यक्रमावर लक्ष केंद्रित करा. मुलाला मशीन बनवू नका, पण वेळापत्रक जरूर बनवा.

3) प्रोत्साहन देत राहा - प्रोत्साहनाचे शब्द नेहमी मुलांमध्ये त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास सहकार्य करणाऱ्या सवयी विकसित करण्यास मदत करतात. प्रौढांसारखे मुलांनाही त्यांना आनंदी करणाऱ्या अशा शब्दांची गरज असते. त्यामुळे पालकांनी त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणे व त्यांच्या कामात त्यांची आवड टिकवून ठेवण्यास मदत करणे आवश्यक आहे.

4) मुलांना वेगवेगळ्या क्रियाकलापांची ओळख करून द्या - आपल्या मुलांना जीवनातील विविध गतीविधींची माहिती द्या. त्यांना त्यांच्या नियमांची माहिती द्या. त्यांना कमी वयातच संगीत, गाय, चित्रकला, खेळ आदींची ओळख करवून द्या. त्यांना सर्वकाही करून पाहू द्या. त्यानंतर त्यांना सर्वाधिक आकर्षित करणारी एखादी अॅक्टिव्हिटी ओळखा.

5) मुलांचे शांतपणे निरीक्षण करा - तुमच्या मुलाला खेळणे आवडत असेल व त्याचा बराचसा वेळ मैदानात जात असेल, तर त्याच्या सवयीकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्याला खेळताना पाहा. आपले पाल्य व त्याच्या यशाचे कौतुक करा. त्याला प्रोत्साहित करा. या गोष्टी त्याला प्रेरित करतात. यामुळे त्याला अधिक चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते. तुमच्या मुलाला गाणे, नृत्य आदींत आवडत असेल तर त्यांच्या कामगिरीचे विश्लेषण करा.

6) त्यांच्या आवडीनिवडी व निर्णयांचे समर्थन करा - मुलांवर रागावू नका. तसेच त्यांची कृती तुम्हाल आवडत नसेल तरीही त्याला दोष देऊ नका. तुमच्या मुलाला व्हिडिओ गेम खेळणे आवडत असेल, तर त्याला अॅनिमेशन डिझायनिग, व्हिडिओ गेम डेव्हलपर किंवा ग्राफिक डिझायनिंग सारख्या विविध क्षेत्रांची ओळख करवून द्या.

तर आजचा करिअर फंडा हा आहे की, पालक व शिक्षकांनी मुलांची उदयोन्मुख आवड समजून घेऊन त्यांना अभ्यासक्रमेतर अॅक्टिव्हिटीज डेव्हलप करण्यात मदत करावी.

करून दाखवू या!

बातम्या आणखी आहेत...