आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ममता-स्टॅलिन यांच्यात वीस मिनिटे झाली चर्चा:राजकारणापेक्षा विकास महत्त्वाचा : ममता बॅनर्जी

चेन्नईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजकारणापेक्षा विकास माेठा आणि महत्त्वाचा असताे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. ममतांनी बुधवारी तामिळनाडूचे समकक्ष एम.के. स्टॅलिन यांची भेट घेऊन चर्चा केली.

उभय नेत्यांमध्ये स्टॅलिन यांच्या निवासस्थानी वीस मिनिटे चर्चा झाली. या बैठकीत ममतांनी त्यांना काेलकाता भेटीचे निमंत्रण दिले. दाेन राजकीय नेते भेटले की त्यांच्यात राजकीय चर्चा झाल्याचा कयास लावला जाताे. परंतु आम्ही विकासावर बाेललाे. कारण मला विकास हा राजकारणापेक्षा माेठा वाटताे, असे ममतांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...