आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मविआ विरुद्ध भाजप:द काश्मीर फाईल्सवरून राज्याचे राजकारण तापणार, फडणवीस यांनी करून दिली बाळासाहेबांची आठवण

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

द काश्मीर फाईल्स या सिनेमावरून राज्यातील राजकारण तापले आहे. देशभरात या सिनेमाची मोठी चर्चा सुरू आहे. काही ठिकाणीतर सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोधही करण्यात आला. काही राज्यात हा सिनेमा टॅक्सफ्री करण्यात आला आहे. तसाच महाराष्ट्रात देखील करण्यात यावा अशी मागणी भाजपने लावून धरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही मागणी फेटाळून लावली आहे, त्यावरून भाजपकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला असून बाळासाहेबांच्या भूमिकेची आठवण करून दिली आहे.

यावर बोलताना अजित पवारांनी जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सिनेमा कर मुक्त केला. तर संपूर्ण देशातून कश्मीर फाईल्स हा सिनेमा चित्रपट करमुक्त होईल असे उत्त्र दिले आहे. यावरून विरोधकांनी सभागृहात चांगलाच गोंधळ घातला. यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांना विचारणा केली असता त्यांनी शिवसेनेवर टीका केली. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

काही लोकांची भूमिका देशविरोधी होती हे समोर आले

महाराष्ट्र सरकार हे काँग्रेसच्या दबावाखाली आहे. काश्मीरबाबत बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आणि आजचे उद्धव ठाकरेंच्या सरकारचे वर्तन यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. काश्मीरची काय अवस्था होती, हे ज्यांनी पाहिलंय त्यांना माहिती आहे. मी स्वत: वयाच्या १८व्या वर्षी मी काश्मीरला गेलो होतो. तिथली दैना मी बघितली आहे. ज्या प्रकारे तिथे अत्याचार झालेत, ते मीही जवळून बघितले आहे. असे देशातले सत्य एखाद्या सिनेमामुळे समोर येत असेल, तर काही लोकांना मिर्ची का लागते? ती यासाठी लागते की त्या वेळची त्यांची भूमिका ही किती संशयास्पद होती, जनविरोधी होती, देशविरोधी होती याचा पर्दाफाश होतो, असे विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

अरे वेड्या कसा वाया गेलास तू ?

कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू अशी अवस्था शिवसेनेची का दिसतेय? कुठे ते बाळासाहेबांचं जाज्वल्य हिंदुत्व जे काश्मिरी पंडितांच्या पाठिशी उभे राहायचे. असा प्रश्न फडणवीसांनी संजय राऊतांना आणि शिवसेना पक्षाला विचारला आहे. तर काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार दाखवला तर मिर्ची का लागते ? शिवसेना इतके बदलण्याचे कारण काय? असा खोचक सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

बातम्या आणखी आहेत...