आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Devendra Fadnavis To Get New Responsibility, BJP To Be Elected In Charge In Bihar Assembly Election ?

राजकीय वर्तुळात चर्चा:देवेंद्र फडणवीसांना मिळणार नवी जबाबदारी? बिहारमध्ये भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून होणार निवड?

पाटणाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांना बिहार विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आता बिहार निवडणूक जवळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर या सर्व चर्चांना सुरुवात झाली आहे.

येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. या सर्व नियोजनात देवेंद्र फडणवीसांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल. फडणवीसांचे संघटन कौशल्य पाहता, त्यांना बिहारमध्ये भाजपचे निवडणूक प्रभारी केले जाऊ शकते.

बिहारमध्ये भाजपचे विद्यमान प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस काम पाहणार असल्याचे वृत्त आहे. लवकरच प्रभारी पदासाठी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती आहे. भाजपने महाराष्ट्रातील निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वाखाली लढवलेल्या आहेत. राज्यात भाजपची सत्ता नसली तरी भाजपच्या सर्वाधिक जागा आहेत. याच कारणामुळे बिहारची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...