आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Devotees Flock To Hinglaj Temple, 350 Km Away, Despite Threats From Pakistani Terrorists; Darshan Took Place Only After Chandragupta Poured Coconut On The Volcano

ग्राउंड रिपोर्ट:पाक दहशतवाद्यांच्या धमक्या मिळूनही 350 किमी दुरून हिंगलाज मंदिरात येतात भाविक; चंद्रगुप्त ज्वालामुखीवर श्रीफळ वाहिल्यानंतरच होते दर्शन

शहा जमाल2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताबाहेरील बलुचिस्तानचे सर्वात प्रमुख हिंगलाज शक्तिपीठ...येथे देवी सतीचे मस्तक पडले होते

तळपत्या उन्हात अनवाणी पायाने मुले व महिला-पुरूष मातेचा जयघोष करत ३०० फूट उंचावरील चंद्रगुप्त ज्वालामुखीजवळ असलेल्या हिंगलाज मंदिरात दर्शनासाठी येतात. हातात श्रीफळ घेतलेल्या ५५ वर्षीय रमेश जयस्वाल यांनी सांगितले, ते सिंध प्रांतातील उमरकोटहून अनवाणी पायाने चालत आले आहेत. १५ दिवसांत ३५० किमी अंतर त्यांनी कापले. त्यांच्यासारखेच इतरही भाविक हिंगलाज मातेच्या दर्शनासाठी अनवाणी पायाने येथे आलेले आहेत. बहुतांश भाविक येथे ९ दिवस मुक्काम करून व्रत करतात. सकाळ-सायंकाळी मातेच्या आरतीत सहभागी होतात. भारताबाहेरील पाकिस्तानातील एकमेव असे शक्तिपीठ असून येथे मोठ्या संख्येने भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागतात. यंदा कोरोनामुळे बंदी असल्याने भाविकांची संख्या रोडावली आहे. परंतु उत्साह कायम आहे. येथे दरवर्षी दोन लाख भाविक येथे येतात. यंदा नवरात्रीत चार दिवसांत ६ हजारांहून अधिक भाविक येथे आलेले होते. सरकारने एका समुहात सहापेक्षा जास्त भाविकांना परवानगी दिलेली नाही. यापूर्वी बसमधून ५० ते ६० लोकांच्या गटाने प्रवास करत होते. यावर्षी कोविडच्या बंधनामुळे भारत, कॅनडा, ब्रिटनहून हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची संख्या यावर्षी येणार नाही. मातेचे दर्शन घेण्यापूर्वी भाविक चंद्रगुप्त ज्वालामुखीवर जातात आणि तेथे श्रीफळ अर्पण करतात. तेथे अनुष्ठानही केले जाते. मंदिराजवळून हिंगोल नदी वाहते. भाविक येथे स्नान करतात. त्यानंतर मातेचे दर्शन घेतात. येथील मुख्य पुजारी गोपाळ महाराज आहेत. अनेक दशकांपूर्वी ते येथे दर्शनासाठी आले अाणि येथेच स्थायिकही झाले. सरकारने या मंदिराचा जीर्णाेद्धार केल्याची माहिती त्यांनी दिली. येथील राहण्याची उत्तम सुविधा व महामार्ग झाल्याने यात्रा करणे सोपे झाले अाहे. या तीर्थस्थळास अतिरेक्यांनी धमक्या दिल्या आहेत. यामुळे मंदिर व यात्रेच्या मार्गावर सुरक्षा दल तैनात आहेत. गेल्या गुरुवारी झालेल्या हल्ल्यात येथे १२ पेक्षा जास्त पोलिस ठार झाले आहेत.

हिंगलाज डोंगरावर पडले होते देवीचे मस्तक

इतिहासकारांच्या मते, हिंगलाज यात्रेचा उल्लेख १४ व्या शतकात सापडतो. भगवान शिवाच्या तांडव नृत्याने भयभीत विष्णूने चक्राने सतीच्या पार्थिवाचे तुकडे केले होते. तेथे जेथे पडली ती शक्तिपीठे झाली. देवीचे मस्तक हिंगलाज डोंगरावर पडले. ५१ शक्तिपीठापैकी ते प्रमुख पीठ आहे.

बातम्या आणखी आहेत...