आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Devotees Flock To Kedarnath And Badrinath Even At Minus 5 Degrees Celsius; The Doors Of Both The Temples Will Open At Gudipadva

नीलकंठ:उणे 5 अंश तपमानातही केदारनाथ, बद्रिनाथला भाविकांची माेठी झुंबड; गुढीपाडव्याला उघडतील दोन्ही मंदिरांची कपाटे

केदारनाथ9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाची निराशा, कडाक्याच्या थंडीवर भक्तीची मात

केदारनाथ मंदिर १६ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता बंद होणार असल्याने दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. कोरोना काळातील निराशेला दूर करत व उणे ५ अंश तपमानातही येथील भाविकांची गर्दी व चमचमणारी पर्वतशिखरे लक्ष वेधत आहेत.

दुसऱ्या छायाचित्रात बद्रीनाथ मंदिरातही दर्शनासाठी भाविकांची अशी झुंबड उडाली आहे. या मंदिराचे कपाटेही यंदा १९ नोव्हेंबरला दुपारी ३.३५ वाजता बंद होणार आहेत. सध्या येथील तपमान उणे १ अंशावर असून थंडीला न जुमानता येथे भक्तिभाव ओसंडून वाहत आहे.छाया : नवनाथ दिघे

गुढीपाडव्याला उघडतील कपाटे

कडाक्याच्या थंडीतही दर्शनासाठी भाविकांचा भक्तिभाव लक्ष वेधून घेत आहे. आता बद्रीनाथची १९ व केदारनाथची १६ नोव्हेंबरला कपाटे बंद झाल्यानंतर ती गुढीपाडव्याला उघडतील. - स्वामी विजयानंद सरस्वती, ऋषिकेश

बातम्या आणखी आहेत...