आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Devotees, SSPs And Municipal Commissioners Continued To Make Videos From The Gallery | Marathi News

चेंगराचेंगरी:भाविक चेंगरले, गॅलरीतून एसएसपी व मनपा आयुक्त व्हिडिओ बनवत राहिले ; 2 भाविकांचा मृत्यू

मथुरा/ लखनऊ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृंदावनच्या बांकेबिहारी मंदिरात कृष्ण जन्माष्टमीनिमित्त शुक्रवारी रात्री मंगल आरतीदरम्यान उसळलेल्या भक्तांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. यात श्वास गुदमरल्यामुळे आणि चेंगरून दोन भाविकांचा मृत्यू तर सात बेशुद्ध झाले. घटनेच्या वेळी जिल्हाधिकारी, एसएसपी आणि शहर आयुक्त मंदिराच्या पहिल्या मजल्याच्या व्हीआयपी गॅलरीत कुटुंबासह उपस्थित होते. त्यातील अनेक जण मोबाइलद्वारे व्हिडिओ बनवत होते. अधिकारी बेफिकीर दिसले. मंदिरातील प्रत्यक्षदर्शी नेत्रपाल म्हणाले की, मंदिराला जोडणाऱ्या अर्धा डझन गल्ल्यांमध्ये भक्त्यांची ताेबा गर्दी होती. रात्री १.४५ वाजता द्वार उघडल्यानंतर भाविक आत घुसू लागले. एकाच वेळी शेकडो लोक आल्याने गेट क्र. एक व चारवर दबाव वाढला आणि अनेक जण बेशुद्ध होऊन कोसळले.

बातम्या आणखी आहेत...