आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:राज्य नव्या प्रक्रियेमुळे बळकट होतील, अटकेतील आरोपीस राज्याला सोपवू : सिंह

बिजेंद्रसिंह शेखावत3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीमा सुरक्षा दलाची कक्षा 50 किमीपर्यंत वाढली, डीजी सिंह यांची पहिली मुलाखत

केंद्र सरकारने सीमा सुरक्षा दलाच्या अधिकारांची कक्षा पश्चिम बंगाल, पंजाब, आसाममध्ये वाढली आहे. तीन राज्यांत बीएसएफच्या क्षेत्राची आंतरराष्ट्रीय सीमा ५० किलाेमीटर आतमध्ये असेल. पूर्वी ही अधिकार कक्षा १५ किलाेमीटरपर्यंत हाेती. या आदेशामुळे राजकारण तापले आहे. विराेधकांनी सरकारचा हा मनमानी निर्णय म्हटले आहे. भास्करने बीएसएफचे महासंचालक पंकज कुमार सिंह यांच्याशी आदेशाबाबत चर्चा केली. मुलाखतीचा हा अंश..

अधिकार कक्षा वाढवण्याकडे कसे पाहता?
पहिल्यांदा अध्यादेशाला समजून घेतले पाहिजे. त्यानुसार बीएसएफकडे केवळ पासपाेर्ट अॅॅक्ट, एनडीपीएस, कस्टम्स अंतर्गत तपास, जप्ती, अटकेचा अधिकार असेल. आपण घुसखाेरांंच्या विराेधात याेग्य कारवाई करू शकू.

काही राज्ये अधिकारांत कपात मानतात
राज्यांच्या पाेलिस-प्रशासनाला काही त्रास हाेणार नाही. उलट त्यांना गुन्हेगारांशी मुकाबला करताना मदत हाेणार आहे. बीएसएफ काेणत्याही व्यक्तीस अटक करेल तेव्हा ते संबंधित राज्याच्या पाेलिसांकडेच त्याला साेपवेल. स्थानिक पाेलिस त्याच्या विराेधात आराेपपत्र दाखल करेल.

काश्मीरसाठी नवीन रणनीती काय असेल?
बीएसएफ पश्चिम क्षेत्रातील पाकिस्तानजवळची २२८९.६ किमीची आंतरराष्ट्रीय सीमा व ८५ किमीच्या सरहद्दीचे संरक्षण करत आहे. सीमेवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अभेद्य निगराणी यंत्रणा उभारण्याची याेजना अंतिम टप्प्यात आहे. शत्रू देशातून काेणीही घुसखाेरी करू शकणार नाही.

पाक ड्राेनला राेखण्याची रणनीती आहे का?
पश्चिमेकडील सीमेवर राॅग ड्राेनचा धाेका हेच वास्तविक आव्हान ठरले आहे. निगराणीसह सीमा क्षेत्रात अमली पदार्थ, शस्त्रे, स्फाेटकांची तस्करीही ड्राेनद्वारे केली जात असल्याची उदाहरणे आहेत. {बीएएसएफमध्ये महिलांची स्थितीबाबत.बीएसएफमध्ये सर्वात आधी १९७२ मध्ये महिलांना आराेग्य क्षेत्रात सेवेची संधी देण्यात आली हाेती. त्यानंतर जनरल ड्यूटी केडरमध्येही महिलांना समाविष्ट केले गेले. सर्व सीमांवर महिला आहेत.

बातम्या आणखी आहेत...