आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर इंटरव्ह्यू:काश्मीरनंतर राजस्थान सीमेवर होत आहेत अतिरेक्यांच्या कारवाया; प्रत्येक प्रयत्न बीएसएफ हाणून पाडेल : अस्थाना

बिकानेर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीएसएफचे डीजी राकेश अस्थाना यांच्याशी खास बातचीत

जम्मू-काश्मीर सीमेवर बीएसएफने काही दिवसांपूर्वी अँटी टनलिंग मोहीम राबवून असे भुयार शोधले, जे अतिरेक्यांच्या घुसखोरीसाठी बनवण्यात आले होते. या मोहिमेत अनेक अतिरेक्यांना ठार मारण्यात आले. तसेच पाकिस्तानलगतच्या पश्चिम राजस्थानात बिकानेर, श्रीगंगानगर आणि बारमेरच्या सीमेवरही बीएसएफ दक्ष झाले आहे. सीमेच्या सुरक्षेशी संबंधित बाबी आणि बॉर्डर टुरिझमच्या मुद्द्यांवर भास्करने सोमवारी बिकानेरला आलेले बीएसएफचे डीजी राकेश अस्थाना यांच्याशी खास बातचीत केली.

प्रश्न : काश्मिरात बीएसएफची अँटी टनलिंग मोहीम किती यशस्वी ठरेल?

उत्तर : जेथून घुसखोरीची जास्त शक्यता असते ते लोकेशन ट्रेस अाम्ही केले आहे. तेथे २४ तास कडक देखरेख ठेवली जाते. मागील मोहिमेत अनेक अतिरेकी मारले गेले.

प्रश्न : पाकिस्तान नार्को टेररिझममध्ये घुसखोरीचा प्रयत्न करतोय का?
उत्तर : जम्मू-काश्मिरात दक्षता असल्याने अतिरेकी कारवाया राजस्थानच्या पश्चिमेकडे सरकल्याचे संकेत आहेत. बारमेर, बिकानेर सीमेवर लक्ष आहे.

प्रश्न : व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये युवकांचा समावेश होत आहे, ते कसे थांबवणार?
उत्तर : सोशल मीडियाचा दुरुपयोग खूप जास्त होत आहे. सीमाभागात लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ नये म्हणून बीएसएफ पातळीवर अनेक सामाजिक उपक्रम चालवले जात आहेत.

प्रश्न : बॉर्डर टुरिझमला चालना देण्यासाठी काय केले जात आहे?
उत्तर : पूर्व व पश्चिममध्ये मोर्चावर बॉर्डर टुरिझम विकसित करत आहेत. बिकानेरच्या सांचू व जैसलमेरमध्ये तनौटला विकसित केले जात आहे. बीएसएफ संग्रहालय, गॅलरी बनवण्यात आली. रिट्रीट सेरेमनीसारखे कार्यक्रम होतील.

प्रश्न : महिला बटालियन कसे काम करत आहे. भरती केव्हा होईल?
उत्तर : महिला दलात खूप चांगले काम करत आहेत. त्या पेट्रोलिंगमध्ये जातात. शस्त्रही चालवतात. कठोर दिवटीही करतात. २०२१ आणि २०२२ मध्ये भरती होईल.

बातम्या आणखी आहेत...