आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चंदीगड:अतिरेकी-गुंडांना ज्यांची धडकी भरे त्यांच्यावरच खुनाचा आरोप, सुपरकॉपचे आरोपी ठरलेल्या माजी महासंचालकांची कहाणी

चंदीगड / सुखबीरसिंह बाजवा8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ही कहाणी सुमेधसिंह सैनींची आहे. सैनी १९८२ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत आणि पंजाबचे डीजीपी होते. मात्र, सध्या बलवंतसिंह मुल्तानी अपहरण व हत्येचे आरोपी आहेत. ज्यांच्यावर २८ वर्षांनंतर एखाद्या गुन्ह्यात थेट खुनाचा आरोप झाला असे ते पंजाब पोलिसांचे पहिले डीजीपी आहेत. ज्यांनी पंजाबमध्ये दहशतवादाविरोधात विशेष योजनेत काम केले ते हेच अधिकारी आहेत. कडवे अतिरेकी व गुंडांना त्यांनी धूळ चारली. सैनी पंजाबमध्ये अतिरेक्यांशी पंगा घेणारे सुपरकॉप डीजीपी राहिलेले केपीएस गिल यांचा उजवा हात मानले जायचे. आजही आंतरराष्ट्रीय पातळीवरील कुख्यात अतिरेकी व गुंडांना त्यांची धास्ती वाटते. विविध अधिकारी व राजकीय नेत्यांच्या निर्णयाविरुद्ध कर्तव्य बजावताना अनेकदा ते वादात सापडले. यामुळे त्यांचा समावेश सुपरकॉप म्हणून होत आला आहे. एवढेच नव्हे तर एकेकाळी ते मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. मात्र, आता मागील काही दिवसांत त्यांच्यावर पंजाब पोलिसांनी अशी कारवाई केली की त्यांना लपून अटकपूर्व जामीन घ्यावा लागला. सैनी मोटार प्रकरणात तीन जण बेपत्ता होणे आणि माजी आयएएस अधिकारी दर्शनसिंग मुल्तानी यांचा मुलगा बलवंतसिंग मुल्तानी याचे अपहरण व हत्येच्या आरोपांचा त्यांना सामना करावा लागत आहे.

२००२ मध्ये कॅप्टन सरकार असताना सैनी आयजी इंटेलिजन्स होते. तेव्हा पंजाब लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष रवी सिद्धू यांना पकडण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. सिद्धूंवर पीसीएस अधिकाऱ्यांच्या भरतीत भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांच्या लॉकरमधून १० कोटी रोख सापडले होते. कॅप्टन सरकार असतानाच माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल व सुखबीर बादल यांच्याविरोधात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीचा खटला दाखल करण्यात आला होता. दोघे काही दिवस कैदेतही होते. त्यानंतर २००७ मध्ये अकाली- भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर सैनी यांनी बादल कुटुंबाला या खटल्यातून बाहेर पडण्यासाठी मोठी मदत केली होती. यामुळे ते बादल कुटुंबाचे विश्वासू झाले आणि कॅप्टनपासून आपोआप दुरावले. बादल सरकारच्या काळातच कॅप्टनविरोधात सिटी सेंटर घोटाळा दाखल करण्यात सैनींची महत्त्वाची भूमिका होती. माजी डीजीपी एस. एस. विर्क यांच्याविरोधातही उत्पनापेक्षा अधिक संपत्तीच्या प्रकरणातही सैनी यांची रणनीती होती. यामुळेच विर्क यांना न्यायालयाचा आसरा घ्यावा लागला होता आणि चौकशीत त्यांच्याविरोधात काहीच न निघाल्याने न्यायालयाने सरकारला फटकारले होते.

बातम्या आणखी आहेत...