आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dhakeshwari Shakti Peeth Is The Biggest Center Of Faith In Bangladesh, Durgatsav Is The Biggest Festival Of Hindus In Bangladesh

दिव्य मराठी विशेष:ढाकेश्वरी शक्तिपीठ बांगलादेशातील श्रद्धेचे मोठे केंद्र, बांगलादेशातील दुर्गात्सव हिंदूंचा सर्वात मोठा सण, यंदा 32 हजार 118 मंडळे

ढाका6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवरात्रीच्या निमित्ताने मंदिरात देशातील व्हीव्हीआयपींची गर्दी असते

सध्या ढाका येथे वेगळाच नजारा दिसून येत आहे. संपूर्ण शहरभर नवरात्रीचा उत्सव दिसतो. दुर्गोत्सव येथील हिंदूंचा सर्वात मोठा उत्सव आहे. सर्वाधिक उत्साह षष्ठीपासून दशमीदरम्यान दिसून येतो. सामान्य लोक वर्षभर जणू या दहा दिवसांची प्रतीक्षा करतात. यंदा बांगलादेशमध्ये ३२ हजार ११८ दुर्गा मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. त्यावरून या गोष्टीचा अंदाज लावता येऊ शकेल. ढाक्यात २३८ दुर्गा मंडळे आहेत. बांगलादेशात हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र ढाकेश्वरी शक्तिपीठ भाविकांच्या जयघोषाने निनादून जात आहे.

नवरात्रीच्या निमित्ताने मंदिरात देशातील व्हीव्हीआयपींची गर्दी असते. राष्ट्रपती, पंतप्रधान, विरोधी नेते, खासदार व भारतीय दूतावासचे अधिकारी येथील हिंदू समुदायाच्या आनंदात सहभागी होतात. नवरात्रीनिमित्त हजारो भाविक मंदिर परिसरात उपस्थित राहतात. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ढाकेश्वरी देवीच्या नावावरूनच शहराचे नाव ढाका पडले आहे. देवी सतीचा मुकुट या भागात पडला होता, अशी आख्यायिका आहे. या शक्तिपीठाचे निर्माण बाराव्या शतकात सैन्य वंशाच्या शासकाने केले होते. मंदिर परिसरात माता सुवर्णरूपात विराजित आहे.

शक्तिपीठ ढाकेश्वरीचे सदस्य मणींद्र म्हणाले, सरकारकडून जारी झालेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येत आहे. शारीरिक अंतर राखून आरती केली जाईल. त्याचे टीव्ही तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे थेट प्रसारण केले जाणार आहे. त्यामुळे लोक घरातून देवीचे दर्शन करू शकतील. ढाका शहरात मुख्य पूजा मंडप ढाकेश्वरी राष्ट्रीय मंदिर, रामकृष्ण मिशन व मठ, कालाबागान, बनानी, शखरी बाजार, रमना काली मंदिर आहे. दुर्गापूजा असुर सम्राट महिषासुराशी लढण्यासाठी सामूहिक ऊर्जेच्या रूपात दुर्गेच्या जन्माचे प्रतीक आहे.

बातम्या आणखी आहेत...