आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगलीच्या कलावंतांचे राष्ट्रीय महोत्सवात सादरीकरण:छत्तीसगडमध्ये लाेककला उत्सवात धनगरी गजा नृत्य

रायपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो

छत्तीसगड येथे आयाेजित राष्ट्रीय लाेकनृत्य महाेत्सवात महाराष्ट्रातील लाेककलावंताने धनगरी गजा ढाेल नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अनिल भीमराव काेळेकर आणि त्यांच्या कुटुंबाने पारंपरिक नृत्यावर आपल्या कलेचे सादरीकरण केले. हा तीनदिवसीय उत्सव आहे. धनगरी गजा नृत्य सादर करणारे ते महाराष्ट्रातील एकमेव कलावंत पथक हाेते.

धनगरी गजाला शंभर वर्षांची परंपरा आहे. आमच्या कुटुंबात वीस पिढ्यांपासून ही नृत्य सादरीकरणाची परंपरा जाेपासण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने कुटुंबातील सदस्य सहभागी हाेतात, अशी माहिती काेळेकर यांनी दिली. राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावर ही कला सादर करण्याची आम्हाला चांगली संधी मिळाल्यामुळे ही लाेककला आणखी सर्वदूर पाेहोचू शकेल. त्याचबराेबर लाेकांना यातून जास्तीत जास्त राेजगारदेखील मिळेल, अशी अपेक्षाही काेळेकर यांनी व्यक्त केली.

आफ्रिकन सिद्दी समाजाचाही सहभाग, दहा देशांतील कलाकार दक्षिण आफ्रिकन वंशाचे व ८५० वर्षांपूर्वी भारतात स्थलांतरित झालेल्या सिद्दी समुदायाचे प्रतिनिधीदेखील या लाेककला महाेत्सवात सहभागी झाले आहेत. मालदीव पथकानेदेखील आपली कला सादर केली. देशभरातून १५०० लाेककलावंत आणि माेझांबिक, मंगाेलिया, टांगाे, रशिया, इंडाेनेशिया, मालदीव, सर्बिया, न्यूझीलंड, इजिप्त इत्यादी दहा देशांतूनही कलावंतांनी सहभाग नाेंदवला आहे.

बातम्या आणखी आहेत...