- Marathi News
- National
- Dhankhad Became The Governor Of The People, Now He Will Be The Vice President, Latest News And Update
सुटाबुटात राहणारे धनखड ठरले जनतेचे राज्यपाल:गरिबांचा आहे लळा; ममतांनी बांधली होती राखी, पण ट्विटरवर केले होते ब्लॉक
उपराष्ट्रपती जगदीप धनखड नेहमीच सुटाबुटात राहतात. पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी असताना ते थेट सर्वसामान्य जनतेत मिसळत. त्यांच्या समस्या ऐकत. याच कारणामुळे त्यांना लोक जनतेचा गव्हर्नर अर्थात राज्यपाल म्हणत. पश्चिम बंगालच्या राज्यपाल ममता बॅनर्जींसोबत त्यांचे खास नाते होते. धनखड यांची राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर ममतांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांना राखी बांधली. त्यानंतरही धनखड यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यामुळे दोघांत राजकीय वितुष्ट निर्माण झाले. हा तणाव एवढा वाढला की, अखेर ममतांनी धनखड यांना ट्विटरवर ब्लॉकच केले.
पश्चिम बंगालमध्ये जगदीप धनखड याना जनतेचे राज्यपाल म्हटले जाते. ते तेथील गरीब व गरजू लोकांत जाऊन त्यांच्या समस्या ऐकतात.
अशोक गहलोत यांच्याशी मैत्री
धनखड यांचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशीही चांगले संबंध आहेत. धनखड यांची बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर जयपूरमधील एका कार्यक्रमात गहलोत यांची जगदीप यांचे छोटे बंधू व काँग्रेस नेते रणदीप धनखड यांच्याशी भेट झाली. गहलोत यावेळी त्यांना शुभेच्छा देताना म्हणाले -प्रथम तर राज्यपाल त्यानंतरही बंगालचा राज्यपाल होणे हे एक मोठे यश आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्यमंत्री अशोक गहलोत व जगदीप धनखड यांच्या भेटीचा प्रसंगही फारच रोचक आहे. दोघांनाही एकमेकांना भेटण्याची इच्छा होती. पण प्रोटोकॉल व व्यस्त कार्यक्रमांमुळे हे शक्य होत नव्हते. त्यामुळे पीसीसी उपाध्यक्ष राजीव अरोरा हे त्यांच्या भेटीतील महत्वाचा दुवा ठरले. त्यांनी जयपूर सिटीझन फोरम संस्थेच्या माध्यमातून धनखड यांच्या सन्मान समारंभ आयोजित केला. त्यात गहलोतही सहभागी झाले.
धनखड पूर्वी काँग्रेसमध्ये होते
राजीव अरोरा यांनी सांगितले की, मुख्यमंत्री गहलोत व धनखड यांच्यात खूप चांगले संबंध आहेत. धनखड पूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यांचे छोटे बंधू रणदीप धनखड तर मुख्यमंत्री गहलोत यांच्या नेतृत्वात एनएसयूआयमध्ये काम केले होते. अरोरा सांगतात -आता काही दिवसांपूर्वीच जगदीप दादा जयपूरला आले होते. त्यावेळी मी त्यांच्याशी बोलताना एनडीएकडे उपराष्ट्रपतीपदाचा तुमच्याहून चांगला उमेदवार नसल्याचे सांगितले होते.
त्यावर त्यांनी जे उत्तर दिले, त्याने सर्वचजण हैरान झाले. ते म्हणाले - राजीव कधीही लॉजिकविना बोलत नाही. पण मी त्यावर काहीच बोलत नाही. यावेळी त्यांनी सर्वांना दार्जिलिंगचा सुप्रसिद्ध चहाही भेट म्हणून दिला होता.
जगदीप धनखड यांचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले. यानंतर ते जवळच्या गावात एक वर्ष शिकण्यासाठी गेले आणि त्यानंतर ते चित्तौडगडमधील सैनिक शाळेत गेले.
धनखड यांना फुटबॉलची आवड आहे. शाळेने 1966 मध्ये इंटर हाऊस फुटबॉल स्पर्धा जिंकल्यानंतर ट्रॉफी आणि संघासह ग्रुप फोटो. (धनखड शेवटच्या रांगेत उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहेत)
जगदीप धनखड हे त्यांच्या गावात इंग्रजीत बोलणारे पहिले व्यक्ती होते. त्या काळात ते इंग्रजी वर्तमानपत्रे वाचत असत. आता गावातील मुलांसाठी इंग्रजी बोलण्याचे अभ्यासक्रम चालवत आहेत.
वकिली करत असलेले जगदीप (डावीकडून दुसरे), तेव्हा आपल्या ड्रेसिंग सेन्सबद्दलही ते चर्चेत होते. सूट त्यांच्या आवडत्या पोशाखांपैकी एक आहे.
जगदीप धनखड आणि त्यांचा धाकटा भाऊ रणदीप धनखड यांचा एकाच दिवशी विवाह झाला होता. फोटोमध्ये जगदीप धनखड यांची पत्नी सुदेश उजवीकडून पहिल्या क्रमांकावर आहे. रणदीपची पत्नी आणि सासू त्यांच्या बाजूला बसल्या आहेत.
जगदीप धनखड यांची पत्नी सुदेश आणि त्यांची सासू मुलगा दीपकसोबत.
पहिल्या फोटोमध्ये जगदीप धनखड त्यांचा मुलगा दीपकसोबत. फेब्रुवारी 1994 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी त्यांच्या मुलाला ब्रेन हॅमरेज झाले. दिल्लीला नेले, पण वाचवता आले नाही. दुसऱ्या फोटोमध्ये जगदीप त्यांची मुलगी कामनासोबत.
जगदीप धनखड यांचे आई-वडील त्यांचा नातू दीपकसोबत. दीपक यांचे फेब्रुवारी १९९४ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी निधन झाले.
जगदीप धनखड त्यांचे भाऊ आणि नातेवाईकांसह. (उजवीकडून क्रमांक एक)
एका कौटुंबिक कार्यक्रमात जगदीप धनखड वडील गोकुलराम चौधरीसोबत.
जगदीप धनखड यांचे देवीलाल चौटाला यांच्याशी चांगले संबंध होते. त्यांच्या सांगण्यावरून धनखड यांनी 1989 मध्ये जनता दलाच्या तिकिटावर झुंझुनूमधून खासदारकीची निवडणूक लढवली आणि नंतर ते केंद्रीय मंत्री झाले. (उजवीकडून चौथ्या क्रमांकावर जगदीप धनखड आणि देवीलाल चौटाला)
केंद्रीय मंत्री झाल्यानंतर जगदीप धनखड आपला धाकटा भाऊ रणदीप धनखड यांची दिल्लीत भेट घेताना.
एका कौटुंबिक कार्यक्रमात आपल्या भाचीशी बोलत असताना जगदीप धनखड.
पत्नी सुदेश धनखड आणि मुलगी कामनासोबत जगदीप धनखड.
पत्नी सुदेश धनखडसोबत जगदीप धनखड.
जोधपूरमधील हरण शिकार प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर जगदीप धनखड यांनी अभिनेता सलमान खानची भेट घेतली.
तिन्ही भाऊ एकत्र (उजवीकडे जगदीप, मधोमध कुलदीप आणि शेवटचे रणदीप).
पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून शपथ घेताना जगदीप धनखड.
पश्चिम बंगालचे राज्यपाल झाल्यानंतर रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जगदीप धनखड यांना राखी बांधून आपला भाऊ बनवले होते.
राज्यपाल झाल्यानंतर धनखड आणि त्यांची पत्नी सुदेश धनखड उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेण्यासाठी आले होते.
पश्चिम बंगालचे राज्यपाल झाल्यानंतर जयपूरमध्ये झालेल्या समारंभात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबत जगदीप धनखड.
जगदीप धनखड यांचे अमित शहा यांच्याशी चांगले संबंध आहेत.
उपाध्यक्षपदासाठी नावाची घोषणा झाल्यानंतर जगदीप धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले होते.
उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर भाजप नेत्यांसोबत जगदीप धनखड.