आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dhanya Of Kerala Stays In Kabul With Her Burqa clad Husband For 5 Years Hiding Her Hindu Identity, Now Hopes Of Returning Home Are Dashed

वायनाड:केरळची धन्या 5 वर्षे हिंदू ओळख लपवून बुरख्यात पतीसह काबूलमध्ये राहिली, आता मायदेशी परतण्याची आशा संपली

वायनाड / के.ए. शाजी17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकात्यातील सुष्मिता बंदोपाध्याय व केरळची धन्या रवींद्रन कधीच भेटल्या नसतील, मात्र तरीही दोघींमध्ये बऱ्याच गोष्टी समान आहेत. दोघींनी अफगाणी नागरिकांशी लग्न केले. या अशा भारतीय महिला आहेत, ज्यांनी १९९६ मध्ये बऱ्हानुदीन रब्बानी सरकार गेल्यानंतर अफगाणिस्तानात तालिबानच्या अति कट्टरपंथी काळातही राहण्याची हिंमत दाखवली. तालिबान महिलांना दुय्यम दर्जाचे नागरिक समजते हे माहिती असूनही. सुष्मिताने धर्मांतर करून इस्लाम स्वीकारला. नंतर ती देशातील महिलांच्या स्थितीबाबत बोलत असल्याने जागतिक व्यक्ती झाली. दुसरीकडे धन्या जवळपास ५ वर्षे काबूलमध्ये हिंदू ओळख लपवून राहिली. तिने बुरखा घातला आणि स्वत:चे खोटे नाव मरियम सांगितले. नंतर कोलकात्याला पळून आली. येथे तिचे आत्मचरित्र काबुलीवालार बंगाली बौ (एका काबुलीवाल्याची बंगाली पत्नी) प्रकाशित केले. तिचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. तिच्या आत्मचरित्रावर हिंदी चित्रपट एस्केप फ्रॉम तालिबान आला. २०१३ मध्ये तालिबान सत्तेत नसतानाही काही अतिरेकी सकाळी सुष्मिताच्या घरी गेले आणि तिचा पती व इतरांना बांधून बाहेर काढले व गोळ्या घातल्या. या क्रूर हत्येनंतर तालिबानींनी त्यांचे मृतदेह मदरशाजवळ फेकले.

दुसरीकडे, धन्या रवींद्रनने हुशारी दाखवत अफगाणी नागरिक हुमायू खोरमसोबत लग्न केले. आपली हिंदू ओळख लपवून व तालिबानपासून लपत आयुष्य घालवले. बुरख्यात खोटे नाव मरियमसोबत दाेन मुलांना इंग्रजी व गणित शिकवणे सुरू ठेवले. धन्याने २००२ मध्ये खोरम, मुलगा नवीन व मुलगी मल्लिकासोबत काबूल सोडले, तेव्हा तालिबान सत्तेत नव्हते. ४९ वर्षांची धन्या सध्या संयुक्त राष्ट्राच्या खाद्य कार्यक्रमात वरिष्ठ अधिकारी म्हणून रोममध्ये काम करत आहे. निवृत्त झाल्यानंतर तिला अफगाणिस्तान परतायची आशा होती, मात्र आता तालिबान परतल्याने आशा ध्वस्त झाल्या. धन्याने रोमहून फोनवर सांगितले, अफगाणिस्तानात राहताना पाच वर्षांत खूप कमी बाहेर निघाले. तरीही मला काबूल पसंत होते. २००२ मध्ये ते सोडताना मला आशा होती की, एक दिवस परतेन. मात्र तिचा पती खोरम, विदेशी नागरिकत्व (ओसीआय) कार्डधारक असल्याने केरळच्या वायनाड जिल्ह्यात राहतात. खोरम यांनी सांगितले, तालिबान पुन्हा सत्तेत येईल अशी मला अपेक्षा होती. म्हणून धोका न पत्करता कुटुुंबासोबत तेथून निघण्याचा निर्णय घेतला. वेळेत बाहेर निघाल्याने मी सुदैवी आहे. धन्याच्या कुटुंबाला पर्यटन व्यवसायात मदत करत आहे.

बातम्या आणखी आहेत...