आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dharmacharya Will Determine The Birth Place Of Lord Parasurama In The Meeting Of Kashi

आज बैठकीचे आयोजन:काशीच्या सभेत भगवान परशुरामांचे जन्मस्थान धर्माचार्य निश्चित करणार

नवी दिल्ली / प्रमोदकुमार12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीचे काम ६०% पूर्ण झाले आहे. आता पुढील मोहीम विष्णूचा अवतार भगवान परशुरामाच्या जन्मस्थळावर मंदिर बांधकामाची असेल. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि राम मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी कामेश्वर चौपाल यांच्यानुसार, २० नोव्हेंबरला संत समाज, संघ आणि भाजपशी संबंधित देशातील २५० धर्माचार्य काशीत धर्मसभा घेत आहेत. यात दोन मुद्दे असतील. प्रथम, परशुरामाचे जन्मस्थान कोणते? कोणते ठिकाण स्वीकारले जावे? दुसरे, परशुरामाच्या मंदिर बांधकामाची मोहीम. रामभद्राचार्य राष्ट्रीय परशुराम परिषदेचे अध्यक्ष आहेत.

बातम्या आणखी आहेत...