आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेंद्रसिंग धोनीचा IPSवर कोर्टाचा अवमान केल्याचा आरोप:मॅच फिक्सिंग प्रकरणात उच्च न्यायालयात घेतली धाव

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मॅच फिक्सिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी संपत कुमार यांच्या विरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत त्यांनी संपत यांच्यावर सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप केला आहे.

धोनीने संपत यांच्याविरुद्ध अवमानाची कारवाई सुरू करून समन्स जारी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. कोर्टात धोनीची ही याचिका स्वीकारून हे प्रकरण सूचीबद्ध करण्यात आले आहे, मात्र शुक्रवारी त्यावर सुनावणी होऊ शकली नाही.

2014 मध्ये दाखल झाला दिवाणी खटला

धोनीने 2014 मध्ये तत्कालीन आयजी संपत कुमार यांच्याविरोधात दिवाणी दावा दाखल केला होता. संपत कुमार यांना मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंगप्रकरणी धोनीशी संबंधित कोणतेही वक्तव्य करण्यापासून रोखण्यासाठी हा खटला दाखल करण्यात आला होता. माजी कर्णधाराने न्यायालयाला विनंती केली होती की, त्याला 100 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी.

त्याचवेळी 18 मार्च 2014 रोजी न्यायालयाने अंतरिम आदेशात संपत कुमार यांना धोनीविरोधात वक्तव्य करण्यापासून रोखले होते. यानंतरही संपत कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून या प्रकरणात न्यायव्यवस्था आणि राज्याच्या वरिष्ठ वकिलांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केली आहे. धोनीने आपल्या याचिकेत संपत यांच्या वक्तव्याचाही उल्लेख केला आहे.

बातम्या आणखी आहेत...