आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी गुरुजींच्या रूपात:झेड ब्लॅक अगरबत्तीच्या जाहिरातीत धोनी झळकणार

दिल्ली/मध्य प्रदेश3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील एक सर्वात मोठे अगरबत्ती व धूपबत्ती विक्रेते असलेल्या म्हैसूर दीप परफ्युमरी हाऊसचा (एमडीपीएच) फ्लॅगशिप ब्रँड असलेल्या झेड ब्लॅकच्या नव्या कॅम्पेनमध्ये एम. एस. धोनी गुरुजींच्या रूपात दिसणार आहे. ही नवी जाहिरात हा झेड ब्लॅकच्या ‘प्रार्थना होगी स्वीकार’ या कॅम्पेनचाच पुढील भाग आहे. कठीण परिस्थितीत फक्त प्रार्थना सर्वांपर्यंत पोहोचणे (व्हायरल होणे) महत्त्वाचे असते, हा ब्रँड संदेश पोहोचवणे या जाहिरातीचे उद्दिष्ट आहे.

झेड ब्लॅक ही देशातील आघाडीच्या तीन अगरबत्ती उत्पादकांपैकी एक आहे. ते तीन कोटी अगरबत्त्यांचे उत्पादन करतात आणि दररोज अगरबत्तीचे १५ लाख पुडे विकतात.

भारतातील दिग्गज क्रिकेटपटू आणि सर्वांचा आवडता कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी गेली सलग पाच वर्षे झेड ब्लॅक ३ इन १ अगरबत्ती ब्रँड एंडॉर्स करत आहे आणि तेव्हापासून कंपनीची जगभरातील लोकप्रियता वाढली आहे. या लाँचबद्दल झेड ब्लॅकचे संचालक अंकित अग्रवाल म्हणाले, “माजी भारतीय क्रिकेट कप्तान एम. एस. धोनी हा जागतिक क्रिकटेमधील एक प्रतिष्ठित क्रिकेटपटू आहे.

बातम्या आणखी आहेत...