आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Dialogue With President Of Aditya Birla Education Trust Neerja Birla, On De Stress

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:मानसिक आरोग्याने 48 % कार्पोरेटस् त्रस्त, पण स्वीकारण्यास तयार नाही, आभासी अन् वास्तव आयुष्यातील फरकाने युवक तणावग्रस्त

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तणावमुक्तीबाबत आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा नीरजा बिर्ला यांच्याशी संवाद

चित्रपट अभिनेते सुशांत सिंह राजपूत तणावाने त्रस्त होते. त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. चित्रपट अभिनेते आमिर खान यांची मुलगी इरा हिने सोशल मीडियावर स्पष्ट केले की, ती चार वर्षांपासून तणावात आहे. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात कार्यरत आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा नीरजा बिर्ला यांच्या म्हणण्यानुसार तणाव कोणालाही कोणत्याही वयात येऊ शकतो. श्रीमंतांपासून ते गरीबापर्यंत यातून कुणीही सुटलेले नाही. देशात १३ ते १५ वर्षाच्या चार किशोरवयीनांपैकी एक व कार्पोरेट क्षेत्रातील प्रत्येक दोन व्यावसायिकांपैकी एक जण तणावाने त्रस्त आहेत. लाखो लोक आहे, जे तणावाशी लढत आहेत. तणावाशी निगडीत बाबींवर ज्येष्ठ पत्रकार शोभा चौधरी यांनी मीडिया प्लॅटफॉर्म इंक्वायरीसाठी नीरजा बिर्ला यांच्याशी केलेला संवाद...

मुले स्वत:ला हानी पोहोचवतील त्यापूर्वीच त्यांना सांभाळा, ते स्वत:ला इजा पोहोचणार नाही, असे वातावरण निर्माण करा

नीरजा यांच्या म्हणण्यानुसार, त्या १०-११ वर्षांपासून दोन शाळा चालवत आहेत. त्यातील काही मुले आणि पालक या समस्येमुळे त्रस्त होते. त्यानंतर त्यांनी या मुद्यावर काम करण्याचा निर्णय घेतला. आपण तणावाने त्रासलेले आहोत, हे लाेकांना आेळखू येत नाही. किंवा दुसऱ्यांना पाहूनही आेळखू शकत नाही. एखाद्यावेळी कोणाला हे माहित असले तरी त्यांना सांगताना संकोच वाटतो. सर्वसाधारणपणे याचे काही मापदंड नाहीत, त्याला आपण पाहू शकत नाही. त्यामुळे आेळखू देखील शकत नाही की तणाव आपल्याला आणि परिवाराला कोणत्याप्रकारे परिणामकारक ठरत आहे. सद्य:स्थितीतील युवक समाज माध्यमांवर आभासी जीवन जगतात. वास्तविक त्यांचे खरेखुरे जीवन वेगळे असते. दोन्ही आयुष्यातील फरकामुळे ते चिंता, आत्मविश्वासाची कमतरता अशा समस्यांमुळे त्रस्त असतात. बहुतांश किशोरवयीन समाज माध्यमांवर योग्य जीवन दर्शवण्याचा प्रयत्न करत असतात. वास्तविक जीवनात ते न मिळाल्यामुळे ते तणावग्रस्त होतात.

नीरजा यांनी तणावाने त्रासलेल्या लोकांंना चांगले आयुष्य देण्यासाठी मुंबईत महापालिकेच्या मदतीने हेल्पलाईन सुरु केली. त्यावर ७ महिन्यात देशातून ६० हजार कॉल्स आले. याला नीरजा एका मोठ्या संकटाची सुरुवात मानतात. जेव्हा आपल्याला वारंवार चांगले वाटणार नाही, वातावरण बदलणे, काम बंद करणे किंवा मनाजोगे काम करुनही चांगले वाटणार नाही, झोप न येणे, सर्वकाही संपले आहे, असे वाटत असल्यास आपण तणावाखाली आहोत, असे समजून तत्काळ तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे. मेंदूतील रासायनिक स्थितीतील बदलामुळे ही स्थिती निर्माण होते. यासाठी आपल्या अवती भवतीचे वातावरण, अनुवांशिकता ही कारणे असतात. कार्पोरेट क्षेत्रातील मानसिक आरोग्याच्या मुद्यावर नीरजा म्हणतात, की पुरुष आपली कमतरता सांगण्यास धजावत नाहीत, परंतु हेल्पलाईनवर ८० टक्के कॉल्स पुरुषांचे आलेले दिसून येतात.

बातम्या आणखी आहेत...