आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बकस्वाहच्या जंगलात देशातील सर्वात माेठा हिऱ्यांचा साठा मिळाला अाहे. येथील जमिनीमध्ये ३.४२ काेटी कॅरेटचे हिरे असण्याचा अंदाज अाहे. हे काढण्यासाठी ३८२.१३१ हेक्टरचे जंगल नष्ट करण्यात येण्याचा अंदाज अाहे. जवळपास २.१५,८७५ झाडे कापण्याची शक्यता अाहे. यामध्ये ४० हजार झाडे सागाची अाहेत. याशिवाय येथे पिंपळ, तेंदू, जांभूळ, बेहडा, अर्जुन अशी औषधी झाडेही आहेत. भास्करला मिळालेल्या माहितीनुसार, बुंदेलखंड प्रदेशातील हिरे शोधण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने २००० ते २००५ दरम्यान एक सर्वेक्षण केले. या क्षेत्रातील तज्ज्ञ ऑस्ट्रेलियन कंपनी रियोटिंटाेने हे सर्वेक्षण केले. या पथकाने बकस्वाहच्या जंगलात नाल्याच्या कडेला किम्बरलाइट दगडांचा उंचवटा पाहिला. किंबरलाइट खडकांमध्ये हिरे सापडतात. हा दगड बघून पथकाच्या अपेक्षा उंचावल्या.
त्यानंतर पथकाने त्या दिशेने काम सुरू केल्यानंतर या भागातील पन्नापेक्षाही येथे १५ पट जास्त हिऱ्यांचा साठा असल्याची पुष्टी मिळाली. येथील जमिनीत एकूण २२ लाख कॅरेटचे हिरे अाहेत. त्यातील १३ लाख कॅरेट हिरे काढण्यात अाले अाहेत, तर ९ लाख कॅरेट हिरे काढणे बाकी अाहे. बकस्वाहमध्ये हिऱ्यांचा साठा असल्याची खात्री पटल्यानंतर राज्य सरकारने दाेन वर्षांपूर्वी या जंगलाचा लिलाव केला. अादित्य बिर्ला समूहातील एस्सेल मायनिंग अँड इंडस्ट्रीजने सर्वात जास्त बाेली लावली. त्यानंतर अाता सरकारने ही जमीन कंपनीला ५० वर्षांच्या भाडेकराराने दिली अाहे. जंगलात ६२.६४ हेक्टर क्षेत्रात हिरे काढण्याचे चिन्हांकित करण्यात अाले अाहे. येथे खाण तयार करण्यात येईल.
पाच वर्षांत बदलला अहवाल... पूर्वी बिबट्या होता, आता नाही
हिरे काढण्यासाठी झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होण्याची खात्री आहे. याशिवाय वन्यजीवनावर संकट निर्माण होईल. मे २०१७ मध्ये जिअाॅलाॅजी अँड मायनिंग, मध्य प्रदेश अाणि रियोटिंटो कंपनीच्या अहवालात असे म्हटले आहे की या जंगलात बिबट्या, गरुड, अस्वल, हरीण, मोर इत्यादी असल्याचे म्हटले हाेते. पण आता नव्या अहवालात हे वन्यजीव येथे नसल्याचे सांगण्यात येत अाहे.. डिसेंबरमध्ये जिल्हा वन अधिकारी (डीएफओ) आणि वनसंरक्षक (सीएफ), छतरपूर यांच्या अहवालातही येथे संरक्षित वन्य प्राणी नसल्याचा दावा केला अाहे.
आदित्य बिर्ला समूहाने मागितले ३८२.१३१ हेक्टर जंगल
या प्रकल्पासाठी आदित्य बिर्ला समूहाने ३८२.१३१ हेक्टर जंगल मागितले असल्याचे सूत्रांकडून समजते, जेणेकरून उर्वरित २०५ हेक्टरचा उपयाेग खाणकाम अाणि खाणीतून निघालेला कचरा टाकण्यासाठी करता येऊ शकेल. कंपनी या कामासाठी २,५०० कोटी रुपये खर्च करणार आहे. ऑस्ट्रेलियन कंपनी रिओटिंटो यांनीही या भाडेपट्ट्यासाठी अर्ज केला होता.
पर्यावरण मंत्रालयाच्या सूचनेनुसार पुन्हा तपास करू
सध्या पर्यावरण मंत्रालयाने स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीसमोर सुनावणी सुरू आहे. त्यांच्याकडून सूचना मिळाल्यावर नवीन अहवाल देण्यात येईल. डिसेंबर २०२० मध्ये दिलेला अहवाल माजी डीएफओने दिला आहे.- अनुराग कुमार, डीएफओ, छतरपूर
महसूल जमिनीवर जंगलाचा विकास करू
‘जिथे बंदर प्रकल्पाची खाण बनणार अाहे तेथे सध्या २.१५ लाख वृक्षांचे जंगल आहे. या जंगलाच्या बदल्यात बकस्वाह तालुक्यातच ३८२,१३१ हेक्टर महसूल जमीन वनक्षेत्रात रूपांतरित करण्याचा प्रस्ताव छतरपूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला अाहे. या जमिनीवर जंगल विकसित करण्यासाठी झालेल्या खर्चाची भरपाई कंपनी करेल. ‘ - पीपी टाटारे, मुख्य वनसंरक्षक, छतरपूर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.