आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Did Even Your Simple Dog Die In The Freedom Struggle? Kharge's Statement About BJP

भाजपबाबत खरगेंचे वक्तव्य:स्वातंत्र्य लढ्यात तुमचा साधा श्वान तरी मेला का?

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानच्या अलवर येथे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सोमवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, आमच्या नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले. ते हुतात्मे झाले. तुमच्या गटातून साधा श्वान तरी मेला का? इंदिरा गांधी यांनी देशाच्या एकतेसाठी बलिदान दिले. राजीव गांधींनी देशासाठी प्राणाची आहुती दिली. तुम्ही कोणते बलिदान दिले? ..असे असूनही ते देशभक्त आणि आम्ही काही बोलले तरी देशद्रोही ठरतो. खरगे पुढे म्हणाले, राहुल गांधींनी चीनचा मुद्दा मांडल्याने सरकार त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु सरकारला या मुद्द्यावर उत्तर देण्याची इच्छा नाही. सरकार संसदेत चर्चेपासून पळ काढत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...