आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रह्मकुमारीज संस्थेच्या प्रमुख दादी हृदयमोहिनी (गुलजार दादी) यांचे गुरुवारी निधन झाले. त्या ९३ वर्षांच्या होत्या. मुंबईच्या सैफी रुग्णालयात गुरुवारी सकाळी १०.३० वाजता त्यांनी अंतिम श्वास घेतला. एअर अॅम्ब्युलन्सने त्यांचे पार्थिव सायंकाळी माउंट अबू येथील मुख्यालय ‘शांतिवना’त आणण्यात आले. अंत्यसंस्कार संस्थेच्या माउंट अबू येथील ज्ञानसरोवर अकादमीत शनिवारी केले जातील. दादींच्या निधनाबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
दादी हृदयमोहिनी यांचा जन्म १९२८ मध्ये झाला होता. त्यांचे बालपणीचे नाव शोथा होते. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षीच ब्रह्मा बाबा यांनी सुरू केलेल्या बोर्डिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. बोर्डिंग स्कूलमध्ये फक्त चौथीत असतानाच जेव्हा त्या ध्यानासाठी बसत असत तेव्हा त्यांना दिव्य अनुभूती होत असे. त्यांना २७ मार्च २०२० रोजी संस्थेच्या तत्कालीन मुख्य प्रशासक १०४ वर्षीय राजयोगिनी दादी जानकी यांच्या निधनानंतर त्यांच्या उत्तराधिकारी करण्यात आले होते.
हैदराबादमध्ये तब्बल १४ वर्षे केली कठोर तपस्या
दादींनी १४ वर्षे बाबांच्या सान्निध्यात राहून कठीण योगसाधना केली. या काळात खाणे-पिणे सोडून दिवसरात्र त्या योगसाधनेतच असत. बाबा एक आठवडाभर मौन पाळायला सांगत असत. तेव्हापासून त्या कामापुरतेच बोलत असत. शेवटपर्यंत त्या मौनात राहिल्या. तपस्येदरम्यान १४ वर्षांपर्यंत त्या बाहेर पडल्या नव्हत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.