आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:चॉकलेट खावेसे वाटत असेल तर शरीराला हवे असते मॅग्नेशियम,सुका मेवा आणि फळे त्याची पूर्तता करू शकतात : आहारतज्ज्ञांचे मत

मेलबर्न13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एखादा घटक कमी झाल्यास शरीर देते संकेत; तज्ज्ञ म्हणाले- त्याकडे दुर्लक्ष करू नकामेलबर्न

कधी कधी चॉकलेट खाण्याची खूप इच्छा होते, किंवा काही गोड वा चिप्स खावेसे वाटतात. सर्वांनाच असा अनुभव येतो. त्याचे कारण कळत नाही, पण आपल्याला कशाची गरज आहे हे त्याद्वारे शरीर सांगू इच्छिते. ऑस्ट्रेलियातील आहारतज्ज्ञ एलिसा व डॅनी यांच्या मते, चॉकलेट खावेसे वाटत असेल तर शरीराला मॅग्नेशियम हवे असते. रक्तशर्करा पातळी, रक्तदाब योग्य ठेवण्यासाठी मॅग्नेशियम आवश्यक आहे. त्याची कमतरता भरून काढण्यासाठी सुका मेवा, फळे खाऊ शकता. खाण्याची अशी इच्छा झाल्यावर शरीरात कशाची कमतरता असते आणि त्याच्या पूर्तीसाठी काय पर्याय आहेत हे तज्ज्ञांनी सुचवले, ते असे...

चिप्स खाण्याची इच्छा असेल तर क्लोराइड-सिलिकॉनची उणीव, गोड खावेसे वाटले तर क्रोमियम-फॉस्फरस घेणे आवश्यक

गोडासाठी पर्याय-द्राक्षे, चीझ
गोड गोळ्या, थंड पेय व गोड पदार्थ खाण्याची जबरदस्त इच्छा होत असेल तर आपल्या शरीराला क्रोमियम, ट्रिप्टोफेन आणि फॉस्फरस या घटकांची प्रचंड गरज असते. या घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी द्राक्षे, रताळे आणि चीझ खाऊ शकता. शेंगदाणे, हिरव्या भाज्या आणि मोड आलेल्या कडधान्याद्वारेही ही कमतरता दूर करता येऊ शकते. ऊर्जा, पेशींची निर्मिती आणि चांगल्या चयापचयासाठी हे घटक आवश्यक आहेत. कार्बोहायड्रेट, प्रोटीन हे पचवण्याचे काम क्रोमियम करते. त्याद्वारे आपल्या मांसपेशी आणि मेंदूला ऊर्जा मिळते.

ब्रेड-पास्ता नव्हे, शेंगा घ्या
बऱ्याचदा ब्रेड आणि पास्ता खाण्याची इच्छा होते तेव्हा शरीरात प्रोटीन आणि नायट्रोजन यांची कमतरता असल्याचे हे संकेत आहेत. अशा वेळी तुम्ही प्लेट भरून शेंगा घेऊ शकता. डाळी आणि मासे याद्वारेही ही उणीव भरून काढता येऊ शकते. खूप तळलेले खावेसे वाटत असेल तर शरीरात कॅल्शियम कमी असल्याचे हे संकेत आहेत. हिरव्या पालेभाज्या, दूध आणि पनीर याद्वारे तुम्ही ही कमतरता भरून काढू शकता. या इच्छा पूर्ण करण्याकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

चिप्सऐवजी काजू उत्तम
चिप्सचे संपूर्ण पाकीट खावे असे तुम्हाला वाटत असेल तर शरीरात क्लोराइड आणि सिलिकॉनची कमतरता असल्याचे हे संकेत आहेत. चिप्सना पर्याय म्हणून काजू खाऊ शकता. मासे आणि बकरीच्या दुधानेही ही कमतरता भरून काढता येऊ शकते. क्लोराइड रक्तातील महत्त्वाचा घटक आहे, तो रक्तदाब संतुलित ठेवतो. त्याव्यतिरिक्त त्वचा, केस आणि नखांच्या नव्या पेशींच्या वाढीसाठी शरीराला सिलिकॉन आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...