आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Difficult For Indian Students To Travel To China Due To Restrictions Requests To The Government To Lift The Travel Ban

चिंता:निर्बंधामुळे चीनला जाण्यास भारतीय विद्यार्थ्यांना अडचणी, प्रवासबंदी उठवण्यासाठी सरकारकडे केली विनंती

नवी दिल्ली/बीजिंगएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आॅनलाइन वैद्यकीय अभ्यासाच्या विराेधात सुरू केली माेहीम

चीनला जाऊ शकत नसल्याने येथे वैद्यकीय शिक्षण घेणारे हजाराे भारतीय विद्यार्थी सध्या त्रस्त झाले आहेत. त्यांच्या अभ्यासावर परिणाम हाेत आहे. वैद्यकीय संस्थांमध्ये प्रवेश घेतलेले हे विद्यार्थी थंडीच्या सुटीत भारतात आले हाेते. काेराेना महामारीमुळे प्रवासावर निर्बंध आल्यामुळे ते अडकून पडले आहेत. येथील शीआन जियाआेताेंग विद्यापीठात एमएबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला असलेली दिल्लीची ऋचा सिंह म्हणते, मी आॅनलाइन अभ्यास करत असले तरी प्रॅक्टिकल करू शकत नाही. शिक्षणाची दाेन वर्षे पूर्ण झाली पण अजूनही मी अॅनाटाॅमी करू शकलेले नाही. तिच्या सारख्याच अन्य विद्यार्थ्यांची हीच परिस्थिती आहे. या संदर्भात विद्यार्थ्यांनी सरकार आणि चीन दूतावासाकडे विनंती केली आहे. त्यांनी साेशल मीडियावर माेहिमही सुरू केली असून त्यात ३ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले आहेत. २०१९च्या आकडेवारीनुसार २३ हजारपेक्षा जास्त भारतीय विद्यार्थी चीनच्या संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत. यामध्ये २१ हजारपेक्षा जास्त जणांनी एमबीबीएसला प्रवेश घेतला आहे. चीनच्या संस्थांमधील हे विद्यार्थी प्रॅक्टिकल विनाच आॅनलाइन अभ्यास करत आहेत.

सप्टेंबर-आॅक्टाेबरपर्यंत तरी आशा नाही
आेमकार मेडिकाॅम या सल्लागार संस्थेचे शमिक मजुमदार म्हणाले, चीनने अन्य देशांतील विद्यार्थ्यांना परतण्याची हळूहळू परवानगी देत आहे. परंतु भारतातील काेराेनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच चीन सध्या हिवाळी आॅलिम्पिकची तयारीही करत आहे. त्यामुळे भारतीयांना या वर्षी सप्टेंबर- आॅक्टाेबरपर्यंत परतण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

चिंता : ऑनलाइनने डाॅक्टर हाेता येत नाही
गेल्या महिन्यात आॅनलाइन शिक्षणाच्या विराेधात विद्यार्थ्यांनी माेहीम सुरू केली.प्रॅक्टिकलशिवाय किंवा लॅब प्रॅक्टिस फक्त आॅनलाइन शिकून डाॅक्टर हाेता येत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. नानजिंग मेडिकल युनिव्हर्सिटीतील प्राची ताेमर विद्यार्थिनी म्हणते, काेराेनामुळे गेल्या एक वर्षापासून आम्ही डिंगटाॅक अॅपवर अभ्यास करत आहाेत. बऱ्याचदा खराब कनेक्शनमुळे अडचणी येतात. तक्रार केली तर प्रतिसादही मिळत नाही. त्यामुळे सरकारने हस्तक्षेप करून आमची मदत केली पाहिजे.

कारण : चीनमध्येच वैद्यकीय शिक्षण का?
सर्वात मोठे कारण म्हणजे चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण भारतापेक्षा जास्त स्वस्त आहे. येथील खासगी व मान्यताप्राप्त विद्यापीठे एनईईटी गुणांच्या आधारे प्रवेश स्वीकारतात, यामुळे दरवर्षी हजारो विद्यार्थी येथे प्रवेश घेतात. शीआन जियाआेताेंग विद्यापीठात शिकणारी चेन्नईची नंदिता रविकुमार म्हणाली, ‘मी येथे ८ लाख रुपये देऊन शिक्षण घेत आहे. भारतात या शिक्षणासाठी मला ३० लाख रुपये खर्च आला असता. तिथे जाण्याचे हे मुख्य कारण आहे. आता मला चिंता वाटू लागली आहे.

बातम्या आणखी आहेत...