आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Digital Currency | India | Marathi News | Cryptocurrency Can Also Fall Within The Scope Of 28% GST After Income Tax; Digital Currency, Security Or Money Will Come In The Realm Of Lottery

क्रिप्टोवर संभ्रम:प्राप्तिकरानंतर 28% जीएसटीच्या कक्षेतही येऊ शकते क्रिप्टोकरन्सी; डिजिटल चलन ना सिक्युरिटी ना मनी, लॉटरीच्या कक्षेत येणार

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तज्ज्ञ म्हणाले, या मुद्द्यावर केंद्राने स्पष्टीकरण जारी करावे

विविध क्रिप्टोकरन्सी सध्या ग्रे-एरियात आहेत. त्याची खरेदी-विक्री बेकायदेशीर नाही. आम्ही कररचना अशी केली आहे की, त्यात कर आकारणीसाठी क्रिप्टो अॅसेट्सना हॉर्स रेसिंग, जुगार व इतर सट्टा व्यवहारातील कमाईसारखे समजले जाईल. वित्त सचिव टी.व्ही. सोमनाथन याच्यानुसार, ‘सरकार क्रिप्टोकरन्सीचे नियमन करण्यासाठी कायदा तयार करण्याच्या दिशेने काम करत आहे.

प्रस्तावित कायद्याचे विधेयक संसदेत सादर करण्यापूर्वी त्यावर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी घ्यावी लागेल.’ सोमनाथन म्हणाले, ‘क्रिप्टोचे नियमन करण्याच्या पद्धतीवर देशात विचारविनिमय सुरू आहे. देशात या मुद्द्यावर व्यापक परामर्श व्हावा असे सरकारचे मत आहे.

तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर काय होत आहे हेही पाहावे लागणार आहे. सरकार नियमनाबाबत घाई करणार नाही. यामुळे अशा व्यवहारांतून होणाऱ्या कमाईवर कर लावला जात आहे. खासगी क्रिप्टोकरन्सी मात्र वैध चलन नसेल. १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या वित्तवर्षात आपली डिजिटल करन्सी लाँच करण्याची रिझर्व्ह बँकेची योजना आहे.’ बऱ्याच चालढकलीनंतर सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात १ एप्रिलपासून क्रिप्टोसह व्हर्च्युअल अॅसेट्सच्या हस्तांतरणातून होणाऱ्या कमाईवर ३०% कराची घोषणा केली आहे.

क्रिप्टोच्या खरेदी-विक्रीवर १ जुलैपासून १% टीडीएस : अर्थसंकल्पानुसार, १ जुलै २०२२ पासून एका वर्षात १० हजार रुपये वा त्यापेक्षा जास्त व्हर्च्युअल करन्सीच्या पेमेंटवर १% टीडीएस लागेल. थ्रेशोल्ड लिमिट विशिष्ट व्यक्तींसाठी वार्षिक ५०,०० रुपये असेल. यात अशा व्यक्ती/एचयूएफचा समावेश आहे, ज्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक असते.

नव्या वित्त वर्षापासून आयटीआर फॉर्ममध्ये क्रिप्टोसाठी नवा कॉलम
महसूल सचिव तरुण बजाज म्हणाले, पुढील वर्षापासून प्राप्तिकर रिटर्न फॉर्ममध्ये क्रिप्टोपासून होणारे फायदे आणि कर पेमेंटसाठी एक वेगळा कॉलम असणार आहे. पुढे ते म्हणाले की, क्रिप्टोकरन्सीपासून होणाऱ्या फायद्यांवर नेहमीच कर लागतो. बजेटमध्ये जे प्रस्तावित केले आहे ते नवा कर नव्हे तर या मुद्द्यावर स्पष्टता प्रदान करते.

क्रिप्टोकरन्सी जुगार, त्यावर करही जुगारातील कमाईसारखा द्यावा लागेल : वित्त सचिव

स्कंद विवेक धर | नवी दिल्ली

क्रिप्टोवर प्राप्तिकर लावल्याने त्यावर जीएसटी आकारला जाण्याची शक्यता वाढली आहे. सरकारने क्रिप्टोला अॅसेट समजून ३० टक्के इन्कम टॅक्स लावला आहे. त्याला सिक्युरिटीचा (रोखे) दर्जा दिला नाही तर लवकरच क्रिप्टोच्या खरेदी-विक्रीवर जीएसटीही लागेल. जीएसटीतज्ज्ञ सुधीर हालाखंडी म्हणाले, ‘वित्त सचिवांनी म्हटले आहे की, सरकार क्रिप्टोला लॉटरी व हॉर्स रेसिंगसारखे समजत आहे. असे झाल्यास त्यावर २८% जीएसटी लागेल.

कारण सध्या खासगी लॉटरी व हॉर्स रेसिंगवर हाच दर लागू आहे. सरकारने या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे. ते दिले नाही तर क्रिप्टोवर जीएसटीची देयता १ जुलै २०१७ पासून लागू होईल.’ क्लिअरटॅक्सचे संस्थापक अर्चित गुप्ता म्हणाले, ‘सध्या क्रिप्टो जीएसटी कायद्यात नाही, मात्र आता त्यावर जीएसटी आकारणी शक्य आहे. यावर आणखी स्पष्टता हवी.”

प्रथमच व्हर्च्युअल डिजिटल अॅसेटच्या रूपात क्रिप्टोची व्याख्या करण्यात आल्यामुळे जीएसटीचा हा मुद्दा अचानक समोर आला आहे. यात क्रिप्टोला ना सिक्युरिटीज मानले आहे ना मनी. चार्टर्ड अकाउंटंट कीर्ती जोशी म्हणाले, ‘क्रिप्टोकरन्सी जर मनी वा सिक्युरिटी असती तर जीएसटी लागला नसता.’ जीएसटीच्या कलम २ (७५) नुसार, मनीचा अर्थ भारतीय वैध चलन वा फेमा कायद्यात येणारे परकीय चलन आहे. मात्र बहुतांश व्हर्च्युअल करन्सी या व्याख्येत येत नाही. यामुळे ती मनी मानली जाऊ शकत नाही. सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स रेग्युलेशन अॅक्टमधील सिक्युरिटीच्या व्याख्येतही व्हर्च्युअल करन्सी बसत नाही.

झुनझुनवालांचा दावा : एकेदिवशी क्रिप्टोकरन्सीचा बाजार कोसळणार
दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला म्हणाले की, एकेदिवशी क्रिप्टोकरन्सीचा बाजार कोसळेल. मात्र इक्विटी बाजारावर मोठा परिणाम होणार नाही. बजेटशी संबंधित प्रश्नावर झुनझुनवाला म्हणाले, इक्विटी व क्रिप्टोचा गुंतवणूक वेगळा आहे. शेअर बाजाराचा उल्लेख करत ते म्हणाले, सध्या हाइप्ड व्हॅल्यू शेअर्समध्ये मंदी आहे.

बातम्या आणखी आहेत...