आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Digital Media Rules Guidelines Latest Update; Ministry On Online News Publishers And OTT

डिजिटल मीडियावर केंद्र कठोर:OTT प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन न्यूज पोर्टलला सरकारची डेडलाईन, 15 दिवसात सांगावे गाइडलाइन्सवर काय केले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने सोशल मीडिया मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याबाबत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी माहिती व प्रसारण विभागाने डिजिटल माध्यमांसह ओटीटी प्लॅटफॉर्मला 15 दिवसांची डेडलाईन दिली आहे. त्याअंतर्गत अशा कंपन्यांना सांगावे लागेल की नव्या मार्गदर्शक सूचनांच्या बाबीत काय केले गेले.

25 फेब्रुवारी रोजी केंद्रातील मोदी सरकारने सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आणि नियम कठोर केले. सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यासाठी फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप यासारख्या सोशल मीडिया कंपन्यांना 3 महिने दिले होते. केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वाची अंतिम मुदत 25 मे रोजी संपली.

अशा परिस्थितीत, केंद्राची नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू न करणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतात बंदी घालण्याचा धोका आहे. यापूर्वी टूलकिट वाद आणि सोशल मीडिया मार्गदर्शक तत्त्वांविषयी गुरुवारी ट्विटरने म्हटले आहे की, सरकारकडे मुदतीची अंमलबजावणी करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे.

बातम्या आणखी आहेत...